ऑपरेशन थंडरबोल्ट : घरात घुसून मारणं याला म्हणतात!

विशाल बडे, टीव्ही 9 मराठी पुलवामा हल्ल्यानंतर भारतात सर्वांचीच युद्धाची भावना निर्माण झाली आणि अमेरिकेने जसं पाकिस्तानमध्ये घुसून ओसामा बिन लादेनचा बदला घेतला, तसं भारतानेही करावं, घरात घुसून मारावं, अशी प्रत्येकाची भावना आहे. सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या या हल्ल्याचा बदला अमेरिकेने दहा वर्षांनी घेतला. म्हणजे अमेरिकेसारख्या देशाला या बदल्याचं नियोजन करण्यासाठी नऊ वर्ष लागली. अर्थात […]

ऑपरेशन थंडरबोल्ट : घरात घुसून मारणं याला म्हणतात!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

विशाल बडे, टीव्ही 9 मराठी

पुलवामा हल्ल्यानंतर भारतात सर्वांचीच युद्धाची भावना निर्माण झाली आणि अमेरिकेने जसं पाकिस्तानमध्ये घुसून ओसामा बिन लादेनचा बदला घेतला, तसं भारतानेही करावं, घरात घुसून मारावं, अशी प्रत्येकाची भावना आहे. सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या या हल्ल्याचा बदला अमेरिकेने दहा वर्षांनी घेतला. म्हणजे अमेरिकेसारख्या देशाला या बदल्याचं नियोजन करण्यासाठी नऊ वर्ष लागली. अर्थात भारताला हे शक्य आहे का, तर होय निश्चित आहे आणि ते आपण सर्जिकल स्ट्राईकमध्ये करुनही दाखवलंय. जगातल्या सर्वात यशस्वी मिलिट्री रेडपैकी भारताची सर्जिकल स्ट्राईक ही आहे. पण आपण फक्त अमेरिकेचं उदाहरण देत असतो तेव्हा जगातल्या आणखी काही महत्त्वाच्या घटनाही महत्त्वाच्या ठरतात. यापैकीच आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची आणि सर्वात यशस्वी घटना म्हणजे ऑपरेशन थंडरबोल्ट.. इस्रायलने राबवलेलं ऑपरेशन थंडरबोल्ट, ज्याचा ना विक्रम आतापर्यंत कुणी मोडलाय, ना यापुढे मोडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हा इस्रायल भारताला जेव्हा म्हणतो, की तुम्ही जे कराल त्यासाठी आम्ही विनाअट तुमच्यासोबत उभे असू, तेव्हा याचं महत्त्व प्रचंड वाढतं. कारण, इस्रायलसारखं ऑपरेशन आतापर्यंत अमेरिका, रशिया यासारख्या देशांनाही राबवता आलेलं नाही. त्यामुळेच अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयए असो, रशियाची केजीबी असो, किंवा भारताची रॉ असो, जगात इस्रायलच्या मोसादची ताकद जगातल्या सर्वांनीच मान्य केलेली आहे.

ही गोष्ट आहे 27 जून 1976 ची.. इस्रायलची राजधानी तेल अविवहून पॅरिसला 248 प्रवासी घेऊन विमान निघालं. ग्रीकची राजधानी एथेन्समध्ये या विमानाने पहिला स्टॉप घेतला. इथे बरेच प्रवासी उतरले आणि काही प्रवासी चढले. हे विमान पुढे फ्रान्सची राजधानी पॅरिसला जाणार होतं. एथेन्समध्ये जे प्रवासी चढले त्यात चार दहशतवादीही होते. या दहशतवाद्यांनी विमान हायजॅक केलं आणि पुढे काही प्रवासी सोडण्याच्या अटीवर इंधन भरलं आणि तिथून उड्डाण घेतली ती थेट युगांडाची राजधानी एंटबी विमानतळावर.. इस्रायलच्या तुरुंगात बंद असलेले काही पॅलेस्टाईनी दहशतवादी सोडणे आणि 50 लाख अमेरिकन डॉलरच्या मागणीसाठी हे विमान हायजॅक केलं होतं. एंटबी विमानतळावर युगांडाचे तेव्हाचे राष्ट्रपती इदी यमीन यांनी या दहशतवाद्यांचं जाहीरपणे स्वागत केलं. इदी यमीन हा जगातला सर्वात मोठा क्रूरकर्मा मानला जातो. असंही म्हणतात की तो माणसाचं मांस खायचा. त्याला विविध बायकांची 43 मुलं होती. युगांडाच्या सैन्याने जाहीरपणे दहशतवाद्यांना समर्थन दिलं. एका देशाच्या राष्ट्राध्यक्षानेच दहशतवाद्यांना समर्थन दिल्यामुळे इस्रायलचं संकट आणखी वाढलं होतं. कारण, हा देश आजूबाजूला नव्हता. इस्रायलपासून पाच हजार किमी अंतरावर असलेल्या युगांडामध्ये इस्रायलच्या जवळपास दीडशे प्रवाशांना वेठीस धरलं होतं. एव्हाना ही बातमी जगभरात पसरली होती आणि इस्रायलमधली परिस्थिती अत्यंत नाजूक बनली होती. दहशतवाद्यांकडून मागण्यांची डेडलाईन वाढवली जात होती. त्यातच तीन दिवसात काही फ्रान्सच्या प्रवाशांची सुटका करण्यात आली. म्हणजे आमचा वाद हा फक्त इस्रायलसोबत असल्याचं दहशतवाद्यांनी जाहीरपणे स्पष्ट केलं होतं. इकडे दहशतवाद्यांच्या मागण्या मान्य न करण्याबाबत इस्रायलचं सरकार ठाम होतं. ऑपरेशन राबवून प्रवाशांची सुटका करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. विशेष कमांडोंच्या नेतृत्त्वात हे ऑपरेशन करण्याचं ठरवलं गेलं. वेळ अत्यंत कमी होता आणि प्रवाशांचा जीव धोक्यात होता. इस्रायलपासून पाच हजार किमी अंतरावर असलेल्या युगांडामध्ये ऑपरेशन करायचं म्हणजे कुणाची तरी मदत लागणार होती. कारण, इस्रायलच्या विमानाला जाताना मध्ये इंधन भरावं लागणार होते. दुसरा एक आफ्रिकन देश इस्रायलच्या मदतीला धावून आला. केनियाच्या तत्कालिन कृषीमंत्र्यांनी त्यांच्या राष्ट्रपतींना इस्रायलची मदत करण्यासाठी तयार केलं. इस्रायलच्या 100 कमांडोची फौज कार्गो विमानाने गेली आणि त्यांनी पहिला स्टॉप केनियात घेतला. तिथे इंधन भरलं आणि एंटबी विमानतळाकडे कूच केली. ईदी यमीन आणि युगांडामधील नेते मर्सिडीज कार वापरायचे. त्यामुळे इस्रायलच्या कमांडोंनी कार्गो विमानातच मर्सिडीज कार नेल्या. युगांडा विमानतळावर इस्रायलचं विमान जेव्हा उतरवण्यात आलं तेव्हा युगांडामध्ये सिग्नल मिळेपर्यंत आणि हे विमान आपलं नाही हे युगांडाच्या सैन्याच्या लक्षात येईपर्यंत मर्सिडीज कारमध्ये बसून इस्रायलचे कमांडो बाहेर पडले. फक्त 100 मिनिटात हे ऑपरेशन फत्ते करुन युगांडाच्या बाहेर पडायचं नियोजन करण्यात आलं होतं. मर्सिडीज कारमधून बाहेर पडेपर्यंत युगांडाच्या एका सैनिकाने गोळीबार सुरु केला. ही वेळ रात्रीची होती. कमांडोंनीही गोळीबाराला उत्तर दिलं आणि एंटबी विमानतळावर असलेल्या युगांडाच्या सर्व सैनिकांचा खात्मा केला. युगांडाचे जवळपास 45 पेक्षा जास्त सैनिक मारले गेले. यानंतर ज्या हॉलमध्ये प्रवासी ठेवले होते तिकडे कूच केली. ज्या फ्रान्सच्या प्रवाशांची सुटका केली होती त्यांच्याकडून सर्व माहिती अगोदरच घेण्यात आली होती. हॉलमध्ये कमांडोंनी एंट्री करताच सर्वांना हालचाल न करण्याचे आदेश दिले. यात चुकून एक इस्रायली प्रवासीच उभा राहिला आणि त्याला गोळी घातली गेली. तर एक जखमी झाला. तिथे असलेल्या दहशतवाद्यांना जागच्या जागी मारण्यात आलं आणि प्रवाशांची सुटका झाली. विश्वास बसणार नाही पण ठरलेल्या 100 मिनिटांच्या आत म्हणजेच 99 मिनिटात इस्रायचलं कार्गो विमान युगांडातून प्रवाशांना घेऊनही बाहेर पडलं होतं. कुणी पाठलाग करु नये म्हणून एंटबी विमानतळावर उभे असलेले युगांडाचे जवळपास 30 विमानं स्फोटाने उडवून दिले आणि ही मोहिम फत्ते केली गेली. या मोहिमेत काही जण जखमी झाले आणि एका कर्णलला वीरमरण आलं. हा कर्णल दुसरा तिसरा कुणी नसून इस्रायलचे सध्याचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहून यांचे मोठे भाऊ योनातन नेत्यान्याहू होते. सकाळी ईदी यमीनला ही माहिती मिळाली तेव्हा त्याचा तिळपापड झाला होता. पाच हजार किमी दूर असलेल्या देशाने आपल्या घरात घुसून माझ्या सैनिकांना मारलं या कल्पनेनेच तो अक्षरशः वेडा झाला. इस्रायलला मदत करणाऱ्या केनियाच्या कृषीमंत्र्यांचं विमान त्याने बॉम्बने उडवलं आणि कित्येक केनियन लोकांची कत्तलही करण्यात आल्याचं बोललं जातं.

इस्रायलचं हे यशस्वी ऑपरेशन जगभरातल्या आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी ऑपरेशनपैकी एक मानलं जातं. अर्थात दुसऱ्या क्रमांकावर आपल्या भारताची सर्जिकल स्ट्राईक आहे. कारण, एकही जीव न गमावता शत्रूच्या घरात घुसून त्यांना मारण्यात आलं होतं. जगात अयशस्वी सर्जिकल स्ट्राईकचेही अनेक उदाहरणं आहेत. अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून ओसामा बिन लादेनला मारलं असलं तरी अमेरिकेचेच याआधी दोन सर्जिकल स्ट्राईक अयशस्वी ठरले आहेत आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जिम्मी कार्टर यांना त्यामुळे राजीनामाही द्यावा लागला होता. कारण, इराणवर चाल करुन गेलेल्या अमेरिकेचे हेलिकॉप्टर पाडण्यात आले आणि अनेक सैनिक शहीद झाले, त्यामुळे भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची जगात वेगळी ओळख आहे. भारताचं कंधार विमान अपहरण असो किंवा जगातल्या विविध सर्जिकल स्ट्राईक असो, इस्रायलची कारवाई अतुलनीय आहे. भारताचं विमान मसूद अजहरच्या सुटकेसाठी जेव्हा पळवण्यात आलं तेव्हा त्या शेकडो प्रवाशांच्या जीवासाठी भारत सरकारला माघार घ्यावी लागली. कारण, आपण कोणताही धोका पत्करु शकत नव्हतो. पण इस्रायलने फक्त आणि फक्त सुटका या उद्देशाने हजारो किमी दूर असलेल्या शत्रूंना त्यांच्याच घरात घुसून मारलं.

(नोटा : ब्लॉगमधील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.