Abdul Sattar: शिवसेनेचे राज्य मंत्री अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर महाराष्ट्रभर चर्चांना उधाण

| Updated on: Jan 06, 2022 | 1:09 AM

खरं तर रश्मी ठाकरेंबद्दलच वक्तव्य असो की युतीवरुन, अब्दुल सत्तार फारच चकीत करणारे बोलले आणि पक्षालाच बुचकळ्यात पाडणारी त्यांची भूमिका आहे. त्यामुळं शिवसेनेच्या नेत्यांनीही त्यांना तात्काळ शिवसेना स्टाईलनं समज देत, तुम्ही काँग्रेसमधून आलात हे अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केलाय.

Abdul Sattar: शिवसेनेचे राज्य मंत्री अब्दुल सत्तारांच्या त्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभर चर्चांना उधाण
राज्यमंत्री अब्दुल सत्तार
Follow us on

मुंबई : रश्मी ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असं धाडसी वक्तव्य शिवसेनेचे राज्य मंत्री अब्दुल सत्तारांनी केलं आणि महाराष्ट्रभर चर्चांना उधाण आलं. मात्र खुद्द संजय राऊतांनी अब्दुल सत्तारांचे कानही टोचले आणि उद्धव ठाकरेच पूर्ण 5 वर्षे मुख्यमंत्री राहतील, असा दावा केला. सत्तार सेनेची भूमिका मांडत नाही, 5 वर्षे उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे नेतृत्व करतील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

अब्दुल सत्तार फक्त रश्मी ठाकरेंबद्दलच बोलले असं नाही तर नितीन गडकरीच युतीचा पूल बांधू शकतात, असंही बोलले. त्यामुळं शिवसेनेचे मंत्रीच असं बोलत असल्यानं, चलबिचल निर्माण होणं साहजिकच होतं. त्यावरुन संजय राऊतांनी आपल्याच मंत्र्यांचा समाचार घेतला. सत्तारांना अजून शिवसेनेची हळद लागायची आहे, असे राऊत म्हणाले. तर चंद्रकांत खैरे यांनीही सत्तारांचे कान टोचले आहेत. सत्तारांना बोलण्याचा अधिकारच नाही, शिस्त पाळावी असे खैरे यांनी म्हटले आहे.

फडणवीसांनीही युतीच्या वक्तव्याची हवा काढली

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही चांगलाच चिमट काढला. नया है वह, म्हणत फडणवीसांनी, सत्तारांच्या युतीच्या वक्तव्याची हवा काढली. नितीन गडकरी आमचे मोठे नेते आहेत. ते युती घडवून आणू शकतात असं सत्तारांना वाटतं याचा मला अतिशय आनंद आहे. पण अब्दुल सत्तार नया है वह. त्यांना काय माहीत आहे शिवसेना. काहीच माहीत नाही सेनेचं. मला तर असं वाटतं की, गेल्या पाच सात महिन्यात ते कधी उद्धवजींनाही भेटले नसतील. युतीबाबत बोलायला कोणी महत्त्वाचा माणूस लागतो ना, असं फडणवीस म्हणाले.

दानवेंनीही चिमटे काढण्याची संधी सोडली नाही

बरं गडकरीच युतीचा पूल बांधू शकतात, असं सत्तार बोलले. त्यानंतर दिल्लीत त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची भेट घेतली. आता ही भेट जळगाव-सोलापूर रेल्वेसाठी घेतल्याचं सत्तार म्हणाले. तर दानवेंनी सत्तारांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही.

शिवसेना नेत्यांनीही शिवसेना स्टाईलने दिली समज

सत्तार हे शिवसेनेचे राज्य मंत्री आहे. खरं तर रश्मी ठाकरेंबद्दलच वक्तव्य असो की युतीवरुन, अब्दुल सत्तार फारच चकीत करणारे बोलले आणि पक्षालाच बुचकळ्यात पाडणारी त्यांची भूमिका आहे. त्यामुळं शिवसेनेच्या नेत्यांनीही त्यांना तात्काळ शिवसेना स्टाईलनं समज देत, तुम्ही काँग्रेसमधून आलात हे अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केलाय. पक्षासंदर्भात किंवा राज्यात मोठा निर्णय घ्यायचा असेल तर शिवसेनेत फक्त उद्धव ठाकरेच बोलतात. मात्र राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी रश्मी ठाकरेंचं मुख्यमंत्रिपद आणि युतीवरुन जी काही वक्तव्य केली. त्यावरुन सत्तारांना शिवसेनेच्या नेत्यांनीच समज दिलीय. (Political after the uproar Shiv Sena’s Minister of State Abdul Sattar’s statement)

इतर बातम्या

‘नाना पटोले, नौटंकी करणे तुमचा स्वभाव, मोदींबद्दल तोंड सांभाळून बोला’, चंद्रकांत पाटलांचा इशारा

Punjab | अडकले मोदी, आठवले गांधी! नेमका काय आहे हा प्रकार जो पुन्हा पुन्हा ट्रेन्ड होतोय?