Lockdown: तूर्तास लॉकडाऊनचा विचार नाही पण निर्बंध वाढवले जातील, आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

| Updated on: Jan 02, 2022 | 12:29 AM

आरोग्य मंत्र्यांनी मात्र सध्या सरकारच्या बैठकांमध्ये लॉकडाऊनची चर्चा नसल्याचं म्हटलं आहे. सध्या तरी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत लॉकडाऊनचा कोणताही विचार आम्ही तूर्तास केलेला नाही, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय.

Lockdown: तूर्तास लॉकडाऊनचा विचार नाही पण निर्बंध वाढवले जातील, आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता, सध्या लॉकडाऊनवरुन चर्चा रंगलीय. त्यात सरकारचे काही मंत्री थेटपणे लॉकडाऊनचे संकेत देत आहेत. मुख्यमंत्री कोरोनावर लवकरच बोलणार असं म्हणतायत तर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी तूर्तास लॉकडाऊनचा विचार नाही पण निर्बंध वाढवले जातील, असं स्पष्टपणे म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांचा कडक निर्बंधाचा इशारा

सध्या वाढती रुग्ण संख्या पाहता, महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांचा सूर हा कडक निर्बंधांचा आहे. तर काही दिवसांत कोरोनावर बोलेन, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलंय.

नवाब मलिक आणि अस्लम शेखने दिले लॉकडाऊनचे संकेत

महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक सध्या हेच विचारतोय की, लॉकडाऊन लागणार का ? याबाबत मंत्री नवाब मलिक आणि अस्लम शेख यांनी लॉकडाऊनचे संकेत दिलेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कडक निर्बंधांवर बोट ठेवलंय. रुग्णांची संख्या वाढीचे प्रमाण काय आहे हे पाहून नियम केले जातील. गरज पडल्यास कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असे अजित पवार म्हणाले आहेत.

रुग्णसंख्या वाढतेय पण लॉकडाऊनची चर्चा नाही

आरोग्य मंत्र्यांनी मात्र सध्या सरकारच्या बैठकांमध्ये लॉकडाऊनची चर्चा नसल्याचं म्हटलं आहे. सध्या तरी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत लॉकडाऊनचा कोणताही विचार आम्ही तूर्तास केलेला नाही, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. मात्र संसर्ग खूपच वाढला आणि 700 मेट्रिक टन ऑक्सिजन कन्झ्मशन होऊ लागलं, की ऑटोमॅटिक महाराष्ट्रात लॉकडाऊन लागेल, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. त्यामुळे लॉकडाऊन बाबत गैरसमज ठेवू नका, असंही ते म्हणालेत. लॉकडाऊनची सध्यातरी शक्यता नाही, मात्र निर्बंध अधिक कडक होतील, असं देखील राजेश टोपे यांनी म्हटलंय.

कोरोनावरुन राजकारण सुरु

एकीकडे महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढतेय. तर दुसरीकडे राजकारणही सुरु झालं आहे. पंतप्रधान मोदी मास्क लावा असं सांगतात, पण भाजपचे नेतेच मास्क लावत नाहीत, भाजपच्या नेत्यांमुळं तिसरी लाट येणार अशी टीका मंत्री मलिकांनी केलीय. संजय राऊतांनी तर अजबच तर्क सांगितलाय. मोदी मास्क लावत नाहीत म्हणून मीही मास्क लावत नाही, असं राऊतांचं म्हणणं आहे.

महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेते भाजपवर टीका करतायत. मात्र खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपेंनाच मास्कचा विसर पडल्याचे चित्र दिसून आले. औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात नियमांचा फज्जा उडाला. काही मोजके सोडले तर कार्यकर्त्यांच्याही तोंडावर मास्क नव्हताच. अखेर माध्यमांचे कॅमेरे दिसताच, राजेश टोपेंनी मास्क लावला. (There is no thought of a lockdown at the moment but restrictions will be increased, the health minister explained)

इतर बातम्या

Uddhav Thackeray|उद्धव ठाकरेंचा ताण नेमका कोण कमी करतंय? पहिल्यांदाच जगजाहीर नाव सांगितलं

‘..आणि मग लोक तारे दाखवतात’, मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेनंतरच्या पहिल्यावहिल्या संबोधनात भाजपा टार्गेटवर