प्रत्येक वेळी सरकारच का दोषी ?

प्रत्येकवेळी सरकारला दोष द्यायचा आणि त्यांच्या नावाने खडे फोडायचे, मग तो विरोधी पक्ष नेते असो वा सर्वसामान्य व्यक्ती! I(Bhandara fire incident)

प्रत्येक वेळी सरकारच का दोषी ?

भंडारा : भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयालात (Bhandara fire incident) रात्री अचानक आग लागली. आगीत होरपळून 10 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. जग पाहण्या आगोदरच चिमुकल्यांनी डोळे झाकले. यावरून राजकीय घडामोडींना वेग आला आणि सुरु झालं तु तु मै मै……

प्रत्येकवेळी सरकारला दोष द्यायचा आणि त्यांच्या नावाने खडे फोडायचे, मग तो विरोधी पक्ष नेते असो वा सर्वसामान्य व्यक्ती! सरकार काय झोपा काढतयं का म्हणून मोकळं व्हायचं. सरकारच्या हलगर्जीपणामुळे हकनाक बळी गेले, असं बोलायला ते उद्या तयार होतात (Bhandara fire incident).

कोवळ्या हळव्या शरीराचे झालेले हाल पाहुन चिमुकल्यांच्या आईचं अवसानच गळालं. ती माय माऊली हंबरुन डोह फोडत होती. क्षणभर काहीच कळालं नाही. लेकरू कायमच गेलं, तळहातावर घेऊन तीने त्याला मन भरून पाहिलंदेखील नाही हो… मन हेलावून टाकणारा तो मातांचा आक्रोश बाहेर कानावर पडू लागला. चिल्यापिल्यांसाठीचा हा आक्रोश पाहुन उपस्थितांचे डोळे ही पाणावले, तर रुग्णालयाच्या भिंतीही या आक्रोशाने शहारल्या. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. संबंधित दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ज्या आधिकाऱ्याच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णालयाकडून शॉर्ट सर्किटचं निमित्त सांगितलं जातयं त्या सरकारी अधिकाऱ्याला जाब विचारणं महत्वाचं आहे. त्यांच्या या रटाळ कारभारामुळे निष्पाप बालकांचा हाकनाक बळी गेला.

सरकारी कर्मचारी पाहा, बँकेत तुमचं पाच मिनिटाचं काम असेल तर तो अधिकारी किंवा कर्मचारी पाच मिनिटाच्या कामाला दोन तास तरी नक्कीच लावणार. तेव्हा आपण लागलीच बोलतो हे सरकार असचं आहे, काही काम करतं नाही. यामध्ये काम न करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई नाही होत तर सरकारवर वर बोट दाखवलं जात. खरचं सरकार काम करतंय का? दोषीवर कारवाई होणार का? प्रत्येक वेळी सरकारचं दोषी का असते? असे एक ना अनेक प्रश्न मनात घर करुन राहतात.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात तेव्हा सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. पण त्या शेतकऱ्याने आमहत्या का केली? हे कधी पडताळून पाहिलं जातच नाही. सरकार कर्ज देतं म्हणून कर्ज काढतात आणि त्या कर्जाची परफेड मात्र वेळेवर करत नाहीत. तर आलेला पैसा कुठेतरी उडवयाचा आणि खूप कर्ज झालं की आपली जीवनयात्रा सपावयाची एवढचं काय तर ते. तरीपण आपण सरकारला दोष देऊन मोकळे होणार. खरचं हे सरकार दोषी आहे का? याचा विचार करणं महत्त्वाचं आहे.

सरकारकडून नुकसान भरपाई देण्याचीही घोषणा करण्यात येते, परंतू दोषींवर कारवाई मात्र लवकर होत नाही. 10 दिवस सर्व बोंबा मारणार बाकी जैसे थे. मग चुक नेमकी कोणाची? आधी काम चुकार लोकांवर कारवाई करणं गरजेचं आहे त्यानंतर ठरवा दोषी कोण तो?

राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे यापूर्वीसुद्धा रुग्णालयात अनेक लोकांचे मृत्यू झालेत. हा निष्काळजीपणा आणखी किती दिवस सोसावा लागणार आहे, अजून किती जणांचा सरकार जीव घेणार? असा सवाल सरकारला विचारला जातोय. मग खरचं प्रत्येक वेळी सरकारचं दोषी असेल का? की जो काम चुकारपणा करतो ती व्यक्ती दोषी असेल? हे मात्र आपल्याला ठरवावं लागेल…..!

हेही वाचा : Special story | ‘बचेंगे तो और भी लढेंगे’, पानिपतची लढाई ते शेतकरी आंदोलन, बुराडीचा रक्तरंजित आणि धगधगता इतिहास

Published On - 6:52 pm, Sun, 10 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI