2 तास 44 मिनिटांचा नॉन-स्टॉप कॉमेडी चित्रपट, हसून-हसून पोट दुखेल, Youtube वर आहे उपलब्ध
2 तास 44 मिनिटांचा प्रचंड कॉमेडी चित्रपट, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हसून-हसून प्रेक्षक थकतात. चित्रपटाने बजेट पेक्षा 7 पट अधिक केली होती कमाई.

भारतीय सिनेमाच्या सुवर्णकाळातील कॉमेडी चित्रपटांची एक वेगळीच जादू होती. त्या काळातील चित्रपट लोक कुटुंबासोबत बसून आवडीने पाहायचे. साध्या कथेलाही इतक्या मनोरंजक पद्धतीने सादर केलं जायचं की चित्रपट संपल्यानंतरही त्यातील प्रसंग आणि संवाद लोकांच्या लक्षात राहायचे.

त्यामुळे अनेक जुने चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आवडीचे आहेत आणि ओटीटी तसेच यूट्यूबवर वारंवार पाहिले जातात. असाच एक चित्रपट जो 1958 साली प्रदर्शित झालेला 'चलती का नाम गाडी' हा चित्रपट प्रेक्षकांसाठी हास्य, रोमान्स आणि थरार यांचा भन्नाट मेळ घेऊन आला.

या चित्रपटातील अनेक गाणी आजही सदाबहार गाण्यांच्या यादीत गणली जातात आणि जुन्या संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये कायम स्थान मिळवून आहेत. या चित्रपटाची कथा तीन भावांभोवती फिरते, जे मिळून एक गॅरेज चालवत असतात.

प्रदर्शनानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं होतं. त्या काळातील प्रेक्षकांसह समीक्षकांनीही चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. उपलब्ध माहितीनुसार, चित्रपटाने आपल्या बजेटच्या सुमारे सातपट म्हणजे जवळपास 2.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता, जो त्या काळात अत्यंत मोठा मानला जात होता.

आजही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. अनेक दशकं उलटल्यानंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे. IMDb वरही या चित्रपटाला सुमारे 8 इतकी उत्कृष्ट रेटिंग मिळाली आहे. हा चित्रपट Airtel Xstream Play, ShemarooMe आणि Prime Video यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.