1993 चा फ्लॉप चित्रपट, जो अचानक OTT वर आला ट्रेंडमध्ये, जगभरात होतेय प्रचंड चर्चा, पाहण्यासाठी उडाली झुंबड
90 च्या दशकात फ्लॉप ठरलेला चित्रपट, अचानक OTT वर आला ट्रेंडमध्ये. टॉप 3 मध्ये करतोय ट्रेंड. 1993 मध्ये प्रदर्शित होताच ठरलेला फ्लॉप. आता का होतोय ट्रेंड?

ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या जगात प्रेक्षकांची पसंती कधी बदलते हे सांगणे कठीण असते. अनेकदा वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेला एखादा चित्रपट अचानक पुन्हा चर्चेत येतो आणि नव्या पिढीचा आवडता ठरतो. सध्या असाच एक प्रकार हॉलीवूडमध्ये पाहायला मिळत आहे.

तब्बल 33 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'स्ट्राइकिंग डिस्टेंस' हा चित्रपट अचानक Netflix वर ट्रेंड होत असून जगभरात सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या चित्रपटांमध्ये स्थान मिळवत आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला हा चित्रपट आता ओटीटीवर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे.

1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या या थ्रिलर चित्रपटात ब्रूस विलिस मुख्य भूमिकेत दिसले होते. रिलीजच्या वेळी या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. समीक्षकांनीही चित्रपटाच्या पटकथेवर टीका केली होती. मात्र आता तीन दशकांनंतर त्याच चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या हा चित्रपट अमेरिकेसह अनेक देशांमध्ये नेटफ्लिक्सवरील टॉप-3 सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या चित्रपटांमध्ये समाविष्ट झाला आहे. नव्या चित्रपटांनाही मागे टाकत या जुन्या चित्रपटाने अचानक लोकप्रियता मिळवल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ओटीटीमुळे जुन्या चित्रपटांना नव्या प्रेक्षकवर्गाची साथ मिळत असल्याचे हे आणखी एक उदाहरण मानले जात आहे. ‘स्ट्राइकिंग डिस्टन्स’च्या यशामुळे भविष्यात आणखी अनेक जुन्या चित्रपटांची नव्याने चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.