Hyundai च्या या कारने होंडा सिटीचं टेन्शन वाढलं! काय आहे खासियत जाणून घेऊयात

| Updated on: Mar 29, 2023 | 8:31 PM

2023 Hyundai Verna कार भारतीय बाजारात दाखल झाली आहे. या गाडीची थेट स्पर्धा होंडा सिटीसोबत असणार आहे. ह्युंदाई कंपनी आता सेडान कार विक्रीवर आपला जोर लावणार आहे. चला जाणून घेऊयात वरनाचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स...

1 / 6
Hyundai Verna 2023 कार नुकतीच लाँच करण्यात आली आहे. या गाडीची किंमत 10.89 लाख रुपयांपासून सुरु होते. या गाडीची थेट स्पर्धा होंडा सिटीशी असणार आहे. होंडा सिटीचं पाचव्या पिढीच्या मॉडेलची एक्स शोरुम किंमत 11.49 लाख रुपये आहे. (Photo: Hyundai/Honda)

2 / 6
ह्युंदाईचं वरना मॉडेल दिसायला आकर्षक आहे. कंपनीने गाडी लाँच केल्यानंतर डिलिव्हरी सुरु केली आहे. या मॉडेलसाटी 8 हजाराहून अधिक बुकिंग मिळाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Photo: Hyundai)

3 / 6
नव्या वरनामध्ये जबरदस्त फीचर्स आहेत. काही फीचर्स पहिल्यांदाच या सेगमेंटमध्ये देण्यात आले आहेत. यात पॉवर्ड ड्रायव्हर सीट, हिटेड आणि व्हेंटिलेटेड सीटसारखे फीचर्स आहेत. यासह इतर फीचर्स आहेत.  (Photo: Hyundai)

4 / 6
ह्युंदाईने नवी सेडान 10.25 इंच इन्फोटेनमेंट युनिटसह सादर केली आहे. यात वायरलेस अॅपल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटो कनेक्टिव्हिटी, रियर एसी व्हेंट, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, स्मार्ट बूट, इलेक्ट्रिक सनरूफ, ऑटो क्लायमेट कंट्रोल, स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल या सारखे फीचर्स आहेत. (Photo: Hyundai)

5 / 6
ह्युंदाईने 65 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देत नवं मॉडेल आणखी सुरक्षित केलं आहे. यात 6 एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी, ISOFIX माउंटिंग पॉईंट, ऑटोमेटिक हेडलँप, बर्गलर अलार्म, इम्पॅकट सेंसिंग ऑटो डोअर अनलॉक, स्पीड सेंसिंग ऑटो डोअर लॉक, इमरजन्सी स्टॉप सिग्नल आणि लेव्हल 2 एडीएएस फीचर्स आहेत. (Photo: Hyundai)

6 / 6
2023 Hyundai Verna दोन पेट्रोल इंजिन पर्याय आहेत. 1.5 लिटर टर्बोचार्ज्ड इंजिन सहा स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा 7 स्पीड डीसीटी गिअरबॉक्ससह आहे. 1.5 लिटर नॅच्युरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा सीव्हीटी गिअरबॉक्ससह येते. (Photo: Hyundai)