2026 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, ज्याची IMDb रेटिंग 8.6, पण कमाई फक्त…

2026 ची सुरुवात बॉलिवूडसाठी खूपच निराशाजनक ठरली आहे. IMDb रेटिंग 8.6 असून देखील 2026 मधील हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे. ज्याने बजेट इतकी देखील कमाई केली नाही.

| Updated on: Feb 11, 2026 | 3:53 PM
1 / 7
2026 Biggest Flop:  2026 ची बॉक्स ऑफिसवरील सुरुवात बॉलिवूडसाठी निराशाजनक ठरली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच सलग मोठ्या बजेटच्या चित्रपटांनी अपेक्षांवर पाणी फेरलं असून निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

2 / 7
आतापर्यंत तीन बिग बजेट चित्रपट फ्लॉपच्या यादीत गेले असून आता आणखी एका बहुप्रतिक्षित चित्रपटाचं नाव या यादीत सामील झालं आहे.

3 / 7
या चित्रपटाकडून प्रेक्षक आणि ट्रेडला मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र प्रदर्शित होताच तो अक्षरशः धडाम कोसळला. 2 तास 9 मिनिटांचा हा अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट म्हणजे ‘मर्दानी 3’.

4 / 7
या चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा लोकप्रिय एसएसपी शिवानी शिवाजी रॉय या भूमिकेत दिसत आहे.

5 / 7
60 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘मर्दानी 3’ 30 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. सुरुवातीला अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती की हा चित्रपट सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’ला टक्कर देईल. मात्र, चित्रपटाची सुरुवात इतकी संथ झाली की त्याचा थेट फटका एकूण कमाईवर बसला.

6 / 7
आतापर्यंत केवळ 12 दिवसांत या चित्रपटाने 38.7 कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजेच बजेट वसूल करण्यासाठी अजूनही सुमारे 21.3 कोटी रुपये कमी आहेत. सध्याची गती पाहता चित्रपट आपला खर्च काढू शकेल की नाही याबद्दल शंका निर्माण झाली आहे.

7 / 7
या चित्रपटाला प्रेक्षकांकडून समीक्षात्मक प्रतिसाद चांगला मिळालेला असून IMDb वर त्याला 8.6 अशी उच्च रेटिंग मिळाली आहे. मात्र, चांगल्या प्रतिक्रिया असूनही त्याचा बॉक्स ऑफिसवर फारसा फायदा झालेला दिसत नाही.