
बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न 20 एप्रिल 2007 ला झाले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

ऐश्वर्या राय हिने लग्नातील मंगलसूत्र अवघ्या काही वर्षातच बदलले होते. हेच नाही तर हे मंगळसूत्र 45 लाखांचे होते. असे असतानाही ऐश्वर्याने हे मंगळसूत्र बदलले.

2011 मध्ये मुलगी आराध्या हिच्या जन्मानंतर ऐश्वर्या राय हिने हे मंगळसूत्र बदलले होते. हे मंगळसूत्र जड आणि लांब असल्याने तिला अडचणी निर्माण होत होत्या.

त्यामुळेच ऐश्वर्या राय हिने लग्नातील मंगळसूत्र अवघ्या काही वर्षात बदलल्याचे सांगितले जाते. ऐश्वर्या रायच्या या मंगळसूत्राची डिझाईन अत्यंत खास होती.

ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असणारी एक अभिनेत्री आहे. हेच नाही तर ऐश्वर्या राय ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. अनेक हिट चित्रपट तिने बाॅलिवूडला दिली आहेत.