47 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारं गाणं, किशोर कुमार यांनी आधी नाकारलं, पण नंतर इतिहास घडवला

बॉलिवूडमधील 47 वर्षांपूर्वीच सर्वात सुपरहिट गाणं, ज्याला सुरुवातीला किशोर कुमार यांनी दिलेला नकार. मात्र, नंतर ठरलं प्रचंड लोकप्रिय. आजही प्रेक्षक त्याचे चाहते.

| Updated on: May 06, 2026 | 12:30 PM
1 / 6
किशोर कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील असे नाव आहे की ज्यांचा आवाज ऐकताच आजही लोक जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. त्यांच्या गायकीत अशी जादू होती की प्रत्येक वयोगटातील श्रोता त्यांच्याशी सहज जोडला जायचा.

किशोर कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील असे नाव आहे की ज्यांचा आवाज ऐकताच आजही लोक जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. त्यांच्या गायकीत अशी जादू होती की प्रत्येक वयोगटातील श्रोता त्यांच्याशी सहज जोडला जायचा.

2 / 6

विशेष म्हणजे त्यांच्या निधनानंतर अनेक वर्षे उलटूनही त्यांची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. आजही त्यांची गाणी तितक्याच प्रेमाने ऐकली जातात. त्यांच्या आवाजातील साधेपणा आणि भावनांची खोली यामुळेच ते इतर गायकांपेक्षा वेगळे ठरले आणि त्यांना खऱ्या अर्थाने सुरांचा बादशाह म्हटले गेले.

3 / 6

किशोर कुमार यांच्या कारकिर्दीत असे अनेक प्रसंग आले, जेव्हा त्यांनी काही गाणी गाण्यास नकार दिला. काही वेळा त्यांना वाटायचे की एखादे गाणे त्यांच्या शैलीशी जुळत नाही किंवा ते त्या मूडमध्ये नाहीत. मात्र, नंतर जेव्हा त्यांना आपली चूक लक्षात आली, तेव्हा त्यांनी तेच गाणे गाऊन इतिहास रचला.

4 / 6

आपल्या चुका मान्य करून त्यातून सुधारणा करण्याची त्यांची वृत्तीच त्यांना अधिक महान बनवते. त्यामुळेच त्यांना चित्रपटसृष्टीत मोठा सन्मान मिळाला आणि आजही त्यांच्याबद्दल तितकीच आदराची भावना आहे.

5 / 6

आपण ज्या गाण्याबद्दल बोलत आहोत, ते जवळपास 47 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले आहे आणि आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘आने वाला पल, जाने वाला है’ हे गाणे आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केले होते तर त्याचे बोल गुलजार यांनी लिहिले होते.

6 / 6

सुरुवातीला किशोर कुमार यांनी हे गाणे गाण्यास नकार दिला होता, कारण त्यांना वाटले की ते त्यांच्या शैलीशी सुसंगत नाही. मात्र, त्यांना समजावण्यात आले आणि अखेर त्यांनी हे गाणे रेकॉर्ड केले. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला आणि हे गाणे सुपरहिट झाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us