AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 लीग स्पर्धा आहे की मस्करी..! चार दिवसात पाकिस्तानी खेळाडू दोन संघाकडून खेळला, झालं असं..

श्रीलंका क्रिकेट बोर्डाची टी20 लीग स्पर्धा अर्थात लंका प्रीमियर लीग स्पर्धेचं नवं पर्व सुरू आहे. या पर्वात एक विचित्र प्रकार क्रीडाप्रेमींना पाहायला मिळाला. एक खेळाडू दोन संघांकडून खेळला.

टी20 लीग स्पर्धा आहे की मस्करी..! चार दिवसात पाकिस्तानी खेळाडू दोन संघाकडून खेळला, झालं असं..
टी20 लीग स्पर्धा आहे की मस्करी..! चार दिवसात पाकिस्तानी खेळाडू दोन संघाकडून खेळला, झालं असं..Image Credit source: PTI
| Updated on: Aug 05, 2026 | 9:21 PM
Share

जगभरात विविध क्रिकेट बोर्डांच्या टी20 लीग स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे टी20 लीग स्पर्धांचा भडिमार झाला आहे. पण आयपीएल स्पर्धेची सर कोणत्याच स्पर्धांना नाही. त्यातल्या त्यात एक दोन लीग स्पर्धांनी प्रतिष्ठा मिळवली आहे. या व्यतिरिक्त इतर लीग स्पर्धा डब्ब्यात गेल्यात असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. इतकंच काय तर अनेक लीग स्पर्धांना वादाची किनारही लाभली आहे. असंच काहीसं लंका प्रीमियर लीग स्पर्धेबाबत आहे. या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडू दोन संघांकडून खेळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकाच पर्वात दोन संघाकडून खेळत त्याने आश्चर्याचा धक्का दिला. पहिला संघ स्पर्धेतून आऊट होताच हा निर्णय घेतला. त्यामुळे असं कसं झालं? असं शक्य आहे का? असे प्रश्न क्रीडाप्रेमींना पडत आहेत.

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या लंका प्रीमियर लीग स्पर्धेचं नवं पर्व नुकतंच सुरू झालं आहे. या स्पर्धेपूर्वीच या लीगला वादाची किनार लाभली होती. जाफना किंग्सच्या मालक लाचखोरी प्रकरणात अडकला होता. असं असताना आता खेळाडूने एकाच पर्वात दोन संघ बदलल्याने आश्चर्य वाटणं सहाजिकच आहे. पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इफ्तिखार अहमद याने लंका प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत चार दिवसांच्या आतच संघ बदलला.

इफ्तिखार पहिल्यांदा डाम्बुलाकडून खेळला

माहितीनुसार, स्पर्धेला सुरूवात झाल्यानंतर 2 ऑगस्टला इफ्तिखार अहमद डाम्बुला सिक्सर्स संघासोबत रुजू झाला. पण त्याचा संघासोबतचा प्रवास फक्त दोन दिवसांचा राहिला. कारण 3 ऑगस्टला डाम्बुला आणि जाफना किंग्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे डाम्बुला संघ गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानावर गेला आणि स्पर्धेतून आऊट झाला. याहसह इफ्तिखारचा संघासोबतचा प्रवासही संपला.

डाम्बुलासाठी साईन केल्यानंतर त्याने चार दिवसातच नव्या संघाची साथ धरली. इफ्तिखारने 5 ऑगस्टला कँडी रॉयल्स संघासोबत करार केला आणि स्पर्धेत पुन्हा सहभागी झाला. आता कँडी संघाकडून खेळणार आहे. म्हणजेच एकाच पर्वात इफ्तिखार दोन संघांकडून खेळणार आहे. यापूर्वी कोणत्याही लीग स्पर्धेत असा प्रकार घडला नव्हता. त्यामुळे इफ्तिखारची चर्चा होणं सहाजिकच आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...