प्रत्येक ब्रेकअप झालेल्या मुलाच्या मोबाईलमध्ये ऐकाला मिळतं 48 वर्ष जुन गाणं, आजही या गाण्याचे लाखो चाहते

48 वर्षांपूर्वीच गाणं, जे आजही प्रत्येक ब्रेकअप झालेल्या मुलांच्या मोबाईलमध्ये ऐकायला मिळतं. आजही या गाण्याचे लाखो चाहते.

| Updated on: May 26, 2026 | 4:01 PM
1 / 5
जुन्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांची जादू आजही रसिकांच्या मनावर कायम आहे. त्या काळातील गाणी ही केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हती तर ती चित्रपट आणि कलाकारांची ओळख बनत असत. अनेक दशकांनंतरही ही गाणी आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात.

2 / 5
अशाच अजरामर गाण्यांपैकी एक म्हणजे 'ओ साथी रे'. 1978 साली प्रदर्शित झालेल्या 'मुकद्दर का सिकंदर' या चित्रपटातील हे गाणे आजही भावनिक गाण्यांच्या यादीत अग्रस्थानी मानले जाते.

3 / 5
गाण्यातील वेदना, विरह आणि प्रेमातील भावनिक तडफड अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे हे गाणे प्रदर्शित होताच प्रचंड लोकप्रिय झाले. हे गाणे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. चित्रपटातील त्यांच्या भावनिक अभिनयामुळे गाण्याचा प्रभाव आणखी वाढला.

4 / 5
ब्रेकअप आणि एकटेपणाची भावना व्यक्त करणारे हे गाणे त्या काळात लाखो चाहत्यांच्या मनाला भिडले. आजही ब्रेकअप झालेल्या तरुणांच्या प्लेलिस्टमध्ये हे गाणे हमखास ऐकायला मिळते.

5 / 5
किशोर कुमार यांच्या आवाजातील वेदना आणि गाण्याची सादरीकरण शैली ही या गाण्याची सर्वात मोठी ताकद मानली जाते. तब्बल 48 वर्षांनंतरही हे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जाते. सोशल मीडियावर, रिअॅलिटी शोमध्ये तसेच संगीत मैफिलींमध्येही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.

Follow Us