डायबिटीजवर परमानंट उपाय सापडला, पाहा नवे संशोधन काय ?
डायबिटीज रुग्णांना कायम औषधे आणि नियमित व्यायाम आणि तसेच आहारातील बदल अशी जीवनशैली स्वीकारायला लागते. भारत तर जगाची डायबिटीजची राजधानी बनली आहे. मात्र डायबिटीजवर संशोधन करणाऱ्या संशोधकांना इन्सुलिन निर्मितीवर यश आले आहे. काय आहे हे संशोधन पाहूयात...

Diabetes signs and symptoms
- जर तुमच्या घरात कोणाला डायबिटीज असेल तर आता चिंता करण्याची काही गरज नाही. जर्मन संशोधकांनी नव्या पॅन्क्रियाटिक पेशींना तयार करुन टाईप-1 डायबिटीजला मूळापासून बरे करण्याचा उपाय शोधला आहे.
- डायबिटीज रुग्णांच्या शरीरात जास्त शुगर असेल तर या रुग्णांना इन्सुलिनची गरज लागते. त्यामुळे त्यांना इन्सुलिन इंजेक्शनची गरज लागते. मात्र या नव्या थेरपीनंतर रुग्णांना आता वारंवार इन्सुलिन इंजेक्शन घेण्याची गरज नाही.
- या नव्या तंत्रज्ञानामुळे टाईप-1 डायबिटीजच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. उपचारानंतर 18 महिन्यानंतरही 82 टक्के रुग्ण आता संपूर्णपणे बरे आहेत. त्यांना कोणत्याही औषधांची गरज नाही.
- जर्मनीतील ही आधुनिक थेरपी मानवाच्या शरीरातील इन्सुलिन तयार करण्याची नैसर्गिक क्षमता पुन्हा सुरु करते.त्यामुळे ज्यांच्या शरीरात जन्मापासूनच इन्सुलिन तयार होत नाही (टाईप-1 ) त्यांना दिलासा मिळाला आहे.
- जर्मनीतील नव्या संशोधनामुळे आता या टाईप-1 रुग्णांना दरवेळी ग्लुकोज तपासण्याच्या तणावातून मुक्ती मिळाली आहे. टाईप-1 चे रुग्ण आता त्यांचे दैनंदिन आयुष्य आनंदाने व्यतित करु शकतात.
- सध्या हे तंत्रज्ञान नवीन असल्याने खूप खर्चिक आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. मात्र भविष्यात हे तंत्रज्ञान सर्वसामान्याच्या आवाक्यात येईल त्यामुळे डायबिटीज रुग्णांचा फायदा होणार आहे.
- जर्मनीतील हा सफल प्रयोग भविष्यात जगभरातील कोट्यवधी डायबिटीजसाठी वरदान सिद्ध होऊ शकतो.त्यामुळे ज्यांना टाईप – 1 डायबिटीज असलेल्यांना दिलासा मिळणार आहे.







