
मुळात म्हणजे बाॅलिवूडचे स्टार किड्स हे कायमच चर्चेत असतात. त्यामध्येही गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन ही तूफान चर्चेत आहे.

नुकताच अंबानींच्या पार्टीत आराध्या ही आई आणि वडिलांसोबत पोहचली होती. यावेळीचा आराध्याचा लूक पाहून लोक हे हैराण झाल्याचे बघायला मिळाले.

आराध्याच्या लूकमध्ये खूप मोठा बदल झालाय. आराध्या बच्चन हिचे अजूनही काही फोटो हे व्हायरल होताना दिसत असून यामध्ये आराध्याचा जबरदस्त लूक दिसतोय.

व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये आराध्या छान दिसतंय. आता लोक हे आराध्या बच्चन हिच्या या लूकचे जोरदार काैतुक करताना देखील दिसत आहेत.

नेहमीच ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.