तुम्हालाही दररोज ABC ज्यूस प्यायची सवय आहे का? शरीरात काय होतात बदल?

धावपळीच्या जीवनात आरोग्य राखणे महत्त्वाचे आहे. एबीसी ज्यूस हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सोपी रेसिपी आणि अनेक आरोग्य फायदे यामुळे हे ज्यूस आजकाल लोकप्रिय आहे.

| Updated on: Sep 14, 2025 | 9:38 PM
1 / 8
हल्ली धावपळीच्या आयुष्यात, संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेकजण एबीसी ज्यूस पिताना दिसतात. गेल्या काही वर्षांपासून एबीसी ज्यूस पिण्याचे प्रमाण वाढले आहे.

2 / 8
अनेक आरोग्य तज्ज्ञ नेहमी एबीसी ज्यूस पिण्याचा सल्ला देतात. सफरचंद, बीट आणि गाजर वापरून तयार होणारा हा ज्यूस अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असतो. रोज या ज्यूसचे सेवन केल्याने शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात. चला तर मग, या ज्यूसचे सेवन करण्याचे फायदे सविस्तरपणे जाणून घेऊया.

3 / 8
रोगप्रतिकारक शक्ती वाढते : सफरचंद, बीट आणि गाजर यांमध्ये व्हिटॅमिन-सी (Vitamin C), बीटा-कॅरोटीन (Beta-Carotene) आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) भरपूर प्रमाणात असतात. हे घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. जर तुम्ही नियमितपणे या ज्यूसचे सेवन केले तर तुम्ही अनेक आजारांशी लढू शकता. ज्यामुळे तुम्ही निरोगी राहता.

4 / 8
एबीसी ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर (Fiber) असते, जे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. हे फायबर आतड्यांची हालचाल सुधारते. बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी करते. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. त्यामुळे, पोटाचे आरोग्य चांगले राहते.

5 / 8
या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन-ए (Vitamin A) आणि व्हिटॅमिन-सी (Vitamin C) सोबत अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. या ज्यूसच्या नियमित सेवनाने त्वचेवरील सुरकुत्या आणि मुरुमांची समस्या कमी होते. तसेच, हे ज्यूस त्वचेला नैसर्गिकरित्या चमक देऊन तारुण्य टिकवून ठेवण्यास मदत करते.

6 / 8
एबीसी ज्यूस शरीराला डिटॉक्सिफाय (Detoxify) करण्यासाठी खूप प्रभावी आहे. बीट आणि गाजर यकृत (Liver) आणि किडनीच्या (Kidney) कार्याला चालना देतात, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. तसेच सफरचंद पचनसंस्था स्वच्छ ठेवण्यास मदत करते.

7 / 8
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर एबीसी ज्यूस तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. या ज्यूसचे सेवन केल्याने पोट भरलेले वाटते. त्यामुळे तुम्ही अतिरिक्त खाणे टाळता.  यामुळे मेटाबॉलिझ्म वाढून वजन कमी करण्यास मदत होते.

8 / 8
एबीसी ज्यूस बनवणे खूप सोपे आहे. यासाठी एक सफरचंद, एक बीट आणि एक गाजर सोलून त्याचे तुकडे करा. हे सर्व तुकडे मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून बारीक करा. गाळून किंवा न गाळताही तुम्ही हा ज्यूस पिऊ शकता.