Abhijeet Dipke: एकमेकांच्या गर्लफ्रेंड्सला कमिटीवर… अभिजीत दीपकेंवर सीजेपीच्या दोन सदस्यांचा आरोप, अडचणीत वाढ?

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आता सीजेपीच्या दोन सदस्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करुन मोठे आरोप केले आहेत.

| Updated on: Aug 08, 2026 | 3:39 PM
1 / 5
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागण करत कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन केले. या आंदोलनाने पडसाद देशातील इतर राज्यांमध्ये देखील दिसून आले. आता सीजेपीच्या आंदोलनावर थेट प्रश्न उपस्थित करत कॉकरोच जनता पार्टीच्या दोन सदस्यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागण करत कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन केले. या आंदोलनाने पडसाद देशातील इतर राज्यांमध्ये देखील दिसून आले. आता सीजेपीच्या आंदोलनावर थेट प्रश्न उपस्थित करत कॉकरोच जनता पार्टीच्या दोन सदस्यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

2 / 5

अभिजीत दिपके यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अहमदाबादमधील कॉकरोच जनता पार्टीच्याच दोन तरुणांनी अन्नपाणी त्याग उपोषण सुरू केले आहे. मनीष ब्रह्मभट आणि राहुल पांड्या अशी उपोषण करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. त्यांनी अभिजीत दिपके आणि कॉकरोच जनता पार्टीच्या टीमवर गंभीर आरोप केले आहेत. आंदोलन देशाचं आहे चेहऱ्याचं नाही असा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे.

3 / 5

माध्यामांशी बोलताना मनीष आणि राहुल म्हणाले की, देशाचे आंदोलन आहे चेहऱ्याचं नाही. त्यामुळे देशातून जेवढ्या लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला ते यामध्ये सामील असायला पाहिजे. त्याच दिवशी मीटिंग घेऊन यांनी दहा-बारा लोकांची टीम घोषित केली. जुने मित्र, कॉलेजचे मित्र यांच्या गाड्यांच्या आजूबाजूने फिरणारे, यांना गाडीमध्ये घेऊन जाणारे पाणी पाजणारे अशा लोकांना यांनी कमिटीमध्ये घेतले आहे. त्यांच्या गर्लफ्रेंड देखील त्यामध्ये आहेत. आम आदमी पार्टीचे अनेक चेहरे त्यामध्ये आहेत. यांनी यांच्या, एकमेकांच्या गर्लफ्रेंडला कमिटीमध्ये घेतले. देश गर्लफ्रेंडचे नेतृत्व स्वीकारणार का? तुम्ही तुमची टीम बनवली आणि आता म्हणतात व्हॅलेंटियरची देशात वेगळी टीम बनवू तर ते तुमचे नोकर आहेत का? ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. लोक तुमच्या म्हणण्यावर दंडे खाण्यासाठी येणार नाही.

4 / 5

पुढे ते म्हणाले, राजा बनल्यासारखे निर्णय घेत आहेत ते चुकीचे आहे. विमानतळावर आला तेव्हा संविधान हातात घेऊन आला होता, संविधान घेऊन येऊ असे बोलत होतात आता तुमची समानता कुठे गेली. आम्ही मीटिंगच्या पहिल्या दिवशी त्याच्या वडिलांना आणि त्याच्या काही नातेवाईकांना भेटलो. तेव्हा त्यांनी उद्या मिटींगला तुम्हाला घेऊ असे सांगितले, पण घेतले नाही. आज एक तास बाकी आहे तुमचा काही विचार असेल तर सांगा, असे सांगितले तेव्हा मी त्यांना एक रील देश के नाम असे करू असा सल्ला दिला, ज्याच्यातून प्रत्येक नागरिकाची अडचण त्याचा मुद्दा उभा राहील असा त्याचा अर्थ होता.

5 / 5

उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की, आम्हाला मीटिंगमध्ये घेतले नाही. मात्र आमचीच आयडिया घेऊन क्या बोलती पब्लिक हे स्लोगन दिलं, आम्ही दिलेली आयडिया घेऊन त्याचे नाव बदलले, आयडिया घेण्याला अडचण नाही पण सर्वांना सोबत घेऊन जायला हवं. यांची स्वतःची मनमानी सुरू आहे सरकार प्रमाणेच लोकांना घाबरवणे, भीती दाखवणे आपले विचार लोकांवर लादणे हेच याचे विचार आहे.लोकांना माहित आहे हा आतापासूनच काय करायला लागला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us