
आचार्य चाणक्यांच्या मते माणूस आयुष्यात खूप चुका करतो आणि नंतर त्या चुकांवरती पश्चाताप करतो. या काळात माणसांनी शांत राहून काम करणे अपेक्षित असते. या काळात वाद न करणे हेच शहाणपणाचे लक्षण असते. चला तर मग जाणून घेऊयात या काळात माणसांनी कोणत्या लोकांपासून लांब राहावे.

वाईट संगत तुमची प्रतिमा आणि तुमचे आयुष्य खराब करू शकते. त्यामुळे खूप विचारपूर्वक मित्र बनवा. एक चांगला मित्र तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो, परंतु वाईट संगत तुमच्या आयुष्याचा काटा बनू शकते. जर तुमचा मित्र वाईट सवयींच्या आहारी गेला असेल तर तुम्हाला ती सवय लागण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.

नशा कोणतीही असो, तरुणाईच कोणाचेही आयुष्य खराब करू शकते. व्यसनामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तिन्ही प्रकारे नुकसान होते. ती व्यक्ती निरोगी राहात नाही. नशा माणसाला आयुष्यातील प्रत्येक सुखाचा क्षण विसरण्यास भाग पाडते.

आपल्या जवळचे लोक - आपल्या जवळचे लोक कोण आहेत ही गोष्ट देखील महत्त्वाची असते. याच व्यक्ती आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करतात. जर आपले जवळचे लोक वाईट असतील तर आपण आयुष्यात कोणतेही काम योग्य पद्धतीने करु शकत नाही.

तरुणपणात कामवासनेची सवय लागली तरी त्याचाही वाईट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. त्यामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा पणाला लागते आणि तो लोकांसाठी अविश्वासू बनतो. आयुष्यात प्रत्येक गोष्ट पुन्हा येऊ शकते पण गेलेली इज्जत पुन्हा मिळत नाही.