AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होय, होय… रनवे दिसत आहे… पायलट आणि ATC मध्ये काय झालं शेवटचं संभाषण? अजितदादांचं प्लेन क्रॅश होण्यापूर्वी काय काय घडलं?

Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून चार्टर्ड विमानाने बारामतीला जात होते. आता पायलट आणि एअर ट्राफिक कंट्रोलर यांच्यात शेवटचं संभाषण काय झालं याची माहिती समोर आली आहे.

होय, होय... रनवे दिसत आहे... पायलट आणि ATC मध्ये काय झालं शेवटचं संभाषण? अजितदादांचं प्लेन क्रॅश होण्यापूर्वी काय काय घडलं?
ajit pawar plane crash deathImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jan 28, 2026 | 9:14 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाजवळ झालेल्या या अपघातात एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्तांमध्ये अजित पवार यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि पायलट यांचा समावेश आहे. या अपघातानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून चार्टर्ड विमानाने बारामतीला जात असताना हा अपघात झाला. आहे. आता या अपघाताचे कारण शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता पायलट आणि एअर ट्राफिक कंट्रोलर यांच्यात शेवटचं संभाषण काय झालं याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी एक लिअरजेट 45 (व्हीटी-एसएसके) विमान मुंबईहून उड्डाण घेऊन बारामतीकडे निघाले. सकाळी 8:18 वाजता, पायलटने बारामती एअर ट्राफिक कंट्रोलरशी संपर्क साधला. त्यावेळी एअर ट्राफिक कंट्रोलरने हवामान ठीक आहे, वारा शांत आहे तसेच दृश्यमानता सुमारे 3000 मीटर असल्याची माहिती दिली. त्यानंतर विमान बारामती विमानतळाजवळ पोहोचले. विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना पायलटला रनवे स्पष्टपणे दिसत नव्हता. कारण वातावरणात धुके असल्यामुळे दृश्यमानता कमी होती.

पायलटचे शेवटचे शब्द काय?

रनवे दिसत नसल्यामुळे पायलटने पहिल्या प्रयत्नात लँडिंग टाळले. पायलटने विमान परत वर नेले. थोड्या वेळाने, लँडिंगचा दुसरा प्रयत्न करण्याचा निर्णय झाला. यावेळी सुरुवातीला रनवे दिसत नव्हता. ट्राफिक कंट्रोलरने तुम्हाला धावपट्टी दिसते का? असा प्रश्न पायलटला विचारला. यावर पायलट म्हणाला ‘अजून नाही’. मात्र काही क्षणानंतर पायलटने ” होय होय, आता रनवे दिसत आहे” अशी माहिती दिली. यानंतर विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र विमान सुरक्षित उतरू शकले नाही. हे विमान बारामती विमानतळाच्या जवळच कोसळले आणि मोठा स्फोट झाला. यात अजित पवार यांचा मृत्यू झाला.

उद्या अंत्यसंस्कार होणार

दरम्यान, आता उद्या सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी आज बारामतीत अजित पवार यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. राज्यात 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच राज्यातील अनेक भागात कडकडीत बंद पाळण्यात आला.

Follow Us
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...