
आचार्य चाणक्यांच्या मते जर तुम्ही एखाद्याला पाहून स्वतःचे मत बनवले तर ती तुमची चूक असू शकते. सर्व लोक जसे दिसतात तसे असतीलच असे नाही. म्हणून माणसाला त्याच्या वागणुकीवरून ठरवले पाहिजे. तो माणूस कसा आहे हे समजून घेण्यसाठी तुम्ही थोडा वेळ द्यायाला हवा.

व्यक्तीसोबत राहताना त्याच्यामधील त्यागची भावना पाहावी . ज्या लोकांमध्ये त्यागाची भावना असते, त्यांच्यात दुस-यांचे दुःख समजून घेण्याची क्षमता असते. असे लोक इतरांनाही मदत करतात.

व्यक्तीच्या कामामधून देखील तो व्यक्ती कसा आहे हे आपल्याला समजते. माणूस ज्या प्रकारचे काम करतो, त्या प्रकारचे गुणही त्याच्यात येतात. जे लोक कठोर परिश्रम करून पैसे कमवतात त्यांना स्वाभिमान असतो आणि अशा लोकांवर विश्वास ठेवता येतो.

व्यक्तीचे चारित्र्य पाहा. पुरुषासोबत राहताना, तो स्त्रियांबद्दल काय विचार करतो हे नक्की पाहा. जो व्यक्ती चारित्र्यवान आहे त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. पण ज्यांचे चारित्र्य भ्रष्ट आहे, अशा व्यक्तीवर विश्वास ठेवला जावू शकत नाही.