
बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे मागील काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता आहूजा यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली.

हेच नाही तर घटस्फोटासाठी सुनिता आहुजा यांनी अर्ज केल्याचे सांगितले जात होते. मात्र, यावर अभिनेता गोविंदा किंवा सुनिता आहुजा यांनी भाष्य केले नव्हते.

आज गणपती बाप्पांच्या आगमनावेळी गोविंदा आणि सुनिता आहुजा हे एकत्र दिसले आहेत. हेच नाही तर त्यांनी दिलखुलास गप्पा देखील मारल्या. सुनिता आहुजा यांनी घटस्फोटाच्या चर्चेवर उत्तर देत म्हटले की, गोविंदा फक्त माझाच आहे.

गोविंदा आणि सुनिता आहुजा यांना एकत्र पाहून हे स्पष्ट झाले की, दोघांचा घटस्फोट होत आहे ही फक्त आणि फक्त अफवाच ठरली.

गोविंदा हा नव्या लूकमध्ये दिसला आहे. शिवाय तो आपल्या आगामी चित्रपटाबद्दल देखील बोलताना दिसला आहे. गोविंदा आणि सुनिता आहुजा यांच्या चाहत्यांना मोठा आनंद यांना एकत्र बघून झालाय.