
अभिनेता करण कुंद्रा हा गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी प्रकाश हिला डेट करत आहे. करण आणि तेजस्वी यांचे ब्रेकअप झाल्याचीही मध्यंतरी जोरदार चर्चा ही रंगताना दिसली.

मुळात म्हणजे करण कुंद्रा याने तेजस्वी प्रकाश हिच्या अगोदर अनेक अभिनेत्रींना डेट केलंय. मात्र, एका वाईट वळणावर करणचे अभिनेत्रींसोबत ब्रेकअप झाले.

तेजस्वी प्रकाश हिच्या अगोदर करण कुंद्रा याने कृतिका कामरा हिला डेट केले. विशेष म्हणजे काही दिवस दोघे रिलेशनमध्येही होते. मात्र, यांचे ब्रेकअप झाले.

अनुषा दांडेकर हिला देखील करण कुंद्रा याने डेट केले आहे. अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा हे लग्न करणार असल्याचे देखील सांगितले जात होते.

योगिता बिहानी हिला देखील करण कुंद्रा याने डेट केले आहे. अनेकदा एकसोबत दोघे स्पॉट देखील झाले आहेत. आता तीन वर्षांपासून करण तेजस्वीला डेट करतोय.