
अभिनेता टीकू तलसानिया यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून टीकू तलसानिया याच्या हाताला काम नाहीये.

टीकू तलसानिया कामाच्या शोधात आहे. पाच वर्षांपासून ते थिअटर प्ले करून जगत आहेत. गेल्या काही वर्षांपासून टीकू हे काम मागताना दिसत आहेत.

पाच वर्ष होऊन जात आहेत, मात्र त्यांना अजूनही कोणी काम देत नाहीये. नुकताच टीकू तलसानिया यांनी म्हटले की, मी पाच वर्षांपासून काम यासाठी मागत आहे की, मला चांगली ऑफर येत नाहीये.

मला चांगले काम हवे आहे आणि मला काम करण्याची इच्छा आहे. माझ्यासाठी नक्कीच पैसे खूप महत्वाचे नाहीत पण काम महत्वाचे आहे.

मी कॉमेडियनचे आणि चांगले पात्र खूप साकारले आहेत. आता मला निगेटिव्ह पात्र करायचे आहेत. यासाठी लोकांनी निर्मात्यांनी अप्रोज करावे, असेही त्यांनी म्हटले..