घाणेरडे मेसेज पाठवायचा, हॉटेल रुमध्ये बोलावायचा…; अभिनेत्रीचे आमदारावर धक्कादायक आरोप

अभिनेत्री या कायम चर्चेत असतात. नुकताच एका अभिनेत्रीने एका बड्या नेत्यावर आरोप केले आहेत. हा आमदार तिला सतत घाणेरडे मेसेज पाठवायचा. एकदा तर तिला हॉटेलमध्ये खोली बूक करुन तेथे बोलवण्याचा प्रयत्न करत होता. आता ही अभिनेत्री कोण चला जाणून घेऊया...

| Updated on: Aug 21, 2025 | 1:09 PM
1 / 7
फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री पडद्यावर जितक्या आनंद दिसतात तितकच त्यांचं पडद्यामागचं आयुष्य हे खडतर असतं. कधी कधी अभिनेत्रींना वाईट अनुभव देखील येतात. नुकताच एक अभिनेत्री मोठ्या राजकीय पक्षाच्या युवा नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिने थेट त्या नेत्यावर घाणेरडे मेजेस केल्याचे तसेच हॉटेलला बोलावल्याचा आरोप केला आहे. नेमकं प्रकरण काय चला जाणून घेऊया...

2 / 7
अभिनेत्री आणि पत्रकार असलेल्या रिनी एन जॉर्जने एका मोठ्या राजकीय पक्षाच्या युवा नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, त्या नेत्याने केवळ आक्षेपार्ह मेसेज पाठवले नाहीत, तर फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये येण्याचा प्रस्तावही दिला होता. जेव्हा तिने पक्षाकडे ही बाब नेण्याची धमकी दिली, तेव्हा त्या नेत्याने तिला धमकी दिली आणि स्पष्टपणे सांगितले, ‘जा, जा सांगून ये…’.

3 / 7
रिनी एन जॉर्ज सध्या त्या नेत्याचे किंवा पक्षाचे नाव जाहीर केलेले नाही, परंतु तिने सांगितले की, या घटनेची माहिती पक्ष नेतृत्वाला देण्यात आली होती. तिने दावा केला की, ‘त्या नेत्याच्या वाईट वर्तनाचा बळी अनेक नेत्यांच्या पत्नी आणि मुलीही झाल्या आहेत.’

4 / 7
‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, रिनीने वारंवार त्या नेत्याचे नाव विचारले गेल्यावर सांगण्यास नकार दिला. तसेच, असे म्हटले जात आहे की, ज्या नेत्याबद्दल बोलले जात आहे, तो आमदार आहे.

5 / 7
अभिनेत्रीने माध्यमांशी बोलताना सांगितले, ‘त्या नेत्याने मला आक्षेपार्ह मेसेज पाठवले. त्याने मला एका ठिकाणी बोलावले. जेव्हा मी त्याला धमकावले, तेव्हा त्याने मला पुढे जाण्यासाठी आव्हान दिले. तो म्हणाला, जा, जा सांगून ये. मला कोणाचीही भीती नाही.’

6 / 7
रिनीने पुढे सांगितले की, त्या नेत्याशी तिचा कसा परिचय झाला. तिने सांगितले की, त्या नेत्याने शेवटचा मेसेज फेब्रुवारी 2025 मध्ये पाठवला होता. ती म्हणाली, ‘त्या नेत्याने एकदा सांगितले होते की, चला, एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये खोली बुक करूया. तू ये.’ मी त्यावेळी त्याला खडसावले होते, काही काळ तो शांत राहिला, पण थोड्या वेळानंतर तो पुन्हा सुरू झाला.

7 / 7
अभिनेत्रीने सांगितले की, ती सोशल मीडियाद्वारे त्या नेत्याच्या संपर्कात आली होती. रिनी एनने दावा केला की, पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करूनही त्या नेत्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आणि त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. जेव्हा रिनी यांना विचारले गेले की, त्या आता त्या नेत्याविरुद्ध कोणती कारवाई करणार का, तेव्हा तिने स्पष्टपणे नकार दिला आणि सांगितले की, तिला तिच्या सुरक्षेची काळजी आहे आणि न्यायव्यवस्थेवर तिचा विश्वास नाही.