
अनेक अभिनेत्रींना करिअरच्या सुरुवातीला वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. एका अभिनेत्री नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये धक्कादायक अनुभव सांगितला आहे. आज याच अभिनेत्रीने सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून डॉली सिंह आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात ही इंटरनेटच्या माध्यमातून केली. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणून ती खूप प्रसिद्ध झाली आणि तिची हीच लोकप्रियता तिला इंडस्ट्रीपर्यंत घेऊन गेली.

डॉली सिंहने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा ती 19 वर्षांची होती, तेव्हा तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला. ही घटना दिल्लीत घडली. तेव्हा ती अभिनय क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती.

डॉली सिंह तेव्हा दिल्लीत होती. अभिनय करिअरसाठी ती एका कास्टिंग डायरेक्टरला भेटली. सुरुवातीला फोनवर बोलणं झालं आणि तेव्हाच तिला जाणवलं की काहीतरी गडबड आहे.

डॉली सिंह तेव्हा याच विचारात होती की हा कॉल तिच्या टॅलेंटसाठी आहे की काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. तेव्हा कास्टिंग डायरेक्टरने तिला दिल्लीतील एका 5 स्टार हॉटेलमध्ये एका प्रोड्यूसरला भेटण्यासाठी बोलावलं.

बैठकीनंतर जे काही डॉलीसोबत घडलं, ते थरकाप उडवणारं होतं. कास्टिंग डायरेक्टरने गाडीत बसताच अचानक अभिनेत्रीला चुंबन घेतलं आणि तिच्या शर्टमध्ये हात घातला.

दिग्दर्शकाच्या कृत्यामुळे डॉली घाबरली. तिला काय करावं हे समजलं नाही. तेव्हा डॉलीचं वय साधारण 19 वर्षांचं होतं, तर तो कास्टिंग डायरेक्टर सुमारे 35-40 वर्षांचा होता.

तेव्हाच डॉलीने त्या व्यक्तीला मागे ढकलले. त्यानंतर डॉलीने विनंती केली की तिला मेट्रो स्टेशनवर सोडावं. त्या दिवशी ती थोडक्यात बचावली, पण ती म्हणते की इंडस्ट्रीत अशा अनेक घटना आहेत ज्या थक्क करणाऱ्या आहेत.