शाहरुख खानसोबत फोटोत दिसणारी ही अभिनेत्री कोण? जिने दिलाय 2000 कोटींचा चित्रपट

शाहरुख खानसोबत फोटोत दिसणारी ही मुलगी बनली आहे मोठी स्टार. जिने केलं आहे बॉक्स ऑफिसवर राज्य. दिला आहे 2000 कोटींचा चित्रपट.

| Updated on: May 27, 2026 | 7:13 PM
1 / 5
90च्या दशकात बालकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री फातिमा सना शेख आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. विशेष म्हणजे, दंगल या सुपरहिट चित्रपटामुळे तिने जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळवली.

2 / 5
फातिमाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 1997 साली प्रदर्शित झालेल्या इश्क या गाजलेल्या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात तिने छोटी भूमिका साकारली होती. या चित्रपटात आमिर खान, अजय देवगन, काजोल आणि जूही चावला यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

3 / 5
चित्रपटातील एका भावनिक दृश्यात फातिमाची निरागस भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. यानंतर 2001 मध्ये आलेल्या वन टू का फोर या चित्रपटात तिने शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर केली. या चित्रपटात तिने एका गोंडस आणि समजूतदार मुलीची भूमिका साकारली होती.

4 / 5
यानंतर काही काळ अभिनयापासून दूर राहून फातिमाने शिक्षण पूर्ण केले. मोठी झाल्यानंतर तिला पुन्हा इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनेक ऑडिशन्स आणि संघर्षाचा सामना करावा लागला. अखेर दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी तिला दंगल मध्ये गीता फोगटची भूमिका दिली.

5 / 5
या भूमिकेसाठी फातिमाने कठोर मेहनत घेतली. तिने कुस्तीचे प्रशिक्षण घेतले, शरीरयष्टी बदलली आणि आपल्या लांब केसांनाही निरोप दिला. दंगल हा चित्रपट भारतासह चीनमध्येही प्रचंड गाजला आणि जागतिक बॉक्स ऑफिसवर 2000 कोटी रुपयांहून अधिक कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला.

Follow Us