
हंसिका मोटवानी या अभिनेत्रीची देशभरात एक वेगळी ओळख आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो रसिकांचे प्रेम मिळवलेले आहे.

तिचे इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर लाखो फॅन्स आहेत. या अभिनेत्रीचा वेगळा चाहतावर्ग असला तरी ती तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्तेत आली होती.

तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत 4 डिसेंबर 2022 रोजी लग्न केलं होतं. मात्र हे लग्न तेव्हा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं होतं.

तिच्या या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर तिला लोकांनी चांगलंच ट्रोल केलं होतं. तिला दुसऱ्या महिलांचे पती चोरणारी अभिनेत्री असं म्हणत हिणवलं गेलं.

हंसिका मोटवानी हिचा पत्नी सोहेल कथुरिया याचे लग्न अगोदर रिंकी नावाच्या महिलेसोबत झालं होतं. रिंकी ही हंसिका मोटवाणीची चांगली मैत्रिण होती.

विशेष म्हणजे सोहेल आणि रिंकी यांच्या लग्नात हंसिकाने हजेरी लावलेली होती. म्हणजेच हंसिका तिच्या पतीच्या पहिल्या लग्नातही गेली होती.

सोहेलने रिंकिसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तो हंसिकाच्या जवळ आला. या दोघांत मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर या दोघांनी लग्न केले.

याच कारणामुळे हंसिकाने रिंकीचे लग्न मोडल्याचा आरोप करण्यात आला. मात्र सोहेलने हे आरोप फेटाळले. माझा रिंकीसोबत घटस्फोट झाल्यानंतर माझ्या आयुष्यात हंसिका आली, असे सोहेलने स्पष्ट केले होते.