
अभिनेत्री हेमा मालिनी हिने अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. हेमा मालिनीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हेमा मालिनी नेहमीच चर्चेत असणारे नाव आहे.

हेमा मालिनीचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिलेले आहे. हेमा मालिनी हिने धर्मेंद्र यांचे अगोदरच लग्न झालेले असताना देखील त्यांच्यासोबत लग्न केले.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे लग्न अनेक वर्ष चर्चेत राहिले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला आता 44 वर्ष पूर्ण झाली आहेत. एका मुलाखतीमध्ये लग्नाबद्दल मोठा खुलासा करताना हेमा मालिनी दिसल्या.

हेमा मालिनी म्हणाल्या की, धर्मेंद्र हे त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत राहतात. जास्त करून ते त्यांच्या फॉर्महाऊसवर राहतात. ते कधीतरी मुंबईला येतात.

प्रत्येक महिलेला तिच्या पतीसोबत मुलांसोबत राहू वाटते. मात्र, आयुष्य बऱ्याच गोष्टी घडतात, ज्या आपल्याला स्वीकाराव्या लागतात.