
अभिनेत्री निया शर्मा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. निया शर्माची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोशल मीडियावर निया सक्रिय असते.

निया शर्मा हिने होळी पार्टीमध्ये चक्क अभिनेत्री आणि तिची मैत्रीण रेहाना पंडित हिच्यासोबत लिपलॉक केले होते. ज्यानंतर मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले. लोकांनी तिच्यावर जोरदार टीका देखील केली होती.

ज्यानंतर निया शर्मा सावरासावर करताना दिसली. निया शर्मा ही नेहमीच स्क्रीनवर बोल्ड सीन देताना देखील दिसते. निया शर्मा आता बिग बॉसच्या घरात धमाका करण्यास तयार आहे.

निया शर्मा ही बिग बॉस सीजन 18 मध्ये जाणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. बिग बॉसच्या घरात निया काय काय धमाका करते हे पाहण्यासारखे ठरेल.

निया शर्माचा चाहतावर्गही मोठा आहे. तिने काही टीव्ही मालिकांमध्ये धमाकेदार भूमिका देखील केल्या आहेत. निया शर्मा काही वेळा वादात देखील अडकलीये.