IND vs NZ : टीम इंडियाची रायपूरमध्ये फिल्डिंग, न्यूझीलंड विरुद्ध 2 खेळाडू टीममधून आऊट, कुणाचा समावेश?
India vs New Zealand 2nd T20i Toss Result and Playing 11 : रायपूरमध्ये टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 2 बदलांसह खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया या सामन्यात चेसिंग करणार आहे.

न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या टी 20I सामन्यात नागपूरमध्ये भारताच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला होता. मात्र त्यानंतर आता शुक्रवारी 23 जानेवारीला भारताने टॉस जिंकला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात फिल्डिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताचा नागपूरनंतर रायपूरमध्येही अशीच विजयी घोडदौड सुरु ठेवण्याचा प्रयत्न आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड पहिल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी सज्ज आहे.
दोन्ही संघात बदल
रायपूरमधील या सामन्यासाठी टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. भारताला त्यापैकी 1 बदल नाईलाजाने करावा लागला आहे. भारताचा उपकर्णधार अक्षर पटेल याला दुखापतीमुळे दुसऱ्या टी 20I सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. अक्षरला पहिल्या सामन्यात बॉलिंग करताना दुखापत झाली होती. तर यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आली आहे. तसेच अक्षरच्या जागी कुलदीप यादव याचा समावेश करण्यात आला आहे. तर बुमराहच्या जागी हर्षित राणा याला संधी मिळाली आहे.
न्यूझीलंडकडून 3 बदल
टीम इंडियासह न्यूझीलंडनेही या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. न्यूझीलंडने भारताच्या तुलनेत 1 जास्त बदल केला आहेत. न्यूझीलंडने एकूण 3 बदल केले आहेत. टीम रॉबिन्सन याच्या जागी टीम सायफर्ट याला संधी देण्यात आली आहे. क्रिस्टियन क्लार्क याच्या जागी झॅक्री फॉल्क्स याचा समावेश करण्यात आला आहे. तर कायले जेमिसनय याच्या जागी मॅट हेन्रीचा समावेश करण्यात आला आहे.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एकूण 26 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने त्यापैकी 15 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने 10 सामन्यांत भारतावर मात केली आहे. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.
तसेच टीम इंडियाची मायदेशातील आकडेवारीही जबरदस्त आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला भारतात झालेल्या 12 पैकी 8 सामन्यांत पराभूत केलंय. तर न्यूझीलंडने भारतात 4 टी 20 सामने जिंकले आहेत.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, टीम सायफर्ट (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरेल मिचेल, झॅक्री फॉल्क्स, मॅट हेन्री, ईश सोढी आणि जेकब डफी.
