धुरंधर चित्रपटाचा रेकॉर्ड मोडणारा 2026 चा ब्लॉकबस्टर, थिएटरबाहेर प्रचंड गर्दी, एकूण कमाई थक्क करणारी
'धुरंधर' चा रेकॉर्ड मोडणारा 2026 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट. थिएटरबाहेर होतेय प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. एकूण कमाई थक्क करणारी.

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ‘धुरंधर’ चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने अनेक मोठ-मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे. अशातच आता एका मराठी चित्रपटाने ‘धुरंधर’ चा रेकॉर्ड मोडला आहे.
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटाने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रदर्शनानंतर अवघ्या तीन आठवड्यांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक यश मिळवत 20 कोटींचा टप्पा पार केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही एक अत्यंत अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
मराठी शाळेच्या वास्तवाशी जोडलेली, भावनिक आणि समाजाला विचार करायला लावणारी ही कथा प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर भावली आहे. शहरांपासून ते गाव-खेड्यांपर्यंत या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून प्रेक्षक चित्रपटगृहांकडे गर्दी करताना दिसत आहेत.
3 आठवड्यांचे कलेक्शन आकडेवारी
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात दमदार सुरुवात करत 6.14 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बजेट इतकी कमाई केली. या चित्रपटाचे बजेट 6.5 कोटी रुपये इतके आहे. तर या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात लोकप्रियतेत वाढ झाल्यानंतर चित्रपटाने 8.76 कोटी रुपयांची कमाई केली. विशेष म्हणजे, दुसऱ्या आठवड्यातील कमाई ही पहिल्या आठवड्यापेक्षा अधिक होती.
दोन आठवड्यांतच चित्रपटाने एकूण 14.90 कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम राहिल्याने चित्रपटाची एकूण कमाई 20.49 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. मराठी चित्रपटासाठी 20 कोटींचा टप्पा पार करणे ही मोठी कामगिरी असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचल्याचे बोलले जात आहे.
मोठ्या हिंदी चित्रपटांनाही दिली टक्कर
सध्या चित्रपटगृहांमध्ये अनेक बिग बजेट हिंदी चित्रपट प्रदर्शित असतानाही ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत ‘धुरंधर’ चित्रपटाला मागे टाकले आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी हे कलाकार आहेत.
मराठी शाळेच्या संघर्षाची आणि मूल्यांची गोष्ट मांडणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ सध्या मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी आणि चर्चेतील चित्रपट ठरत असून, पुढील आठवड्यांतही त्याची घोडदौड कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
