‘मला नाईलाजाने..’, वाढदिवसाच्या दिवशीच प्राजक्ता माळीने घेतला मोठा निर्णय, होतंय सर्वत्र कौतुक

प्राजक्ता माळी आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. अशातच तिने तिच्या आयुष्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. ज्याची सोशल मीडियावर होतेय प्रचंड चर्चा.

| Updated on: Aug 08, 2026 | 7:15 PM
1 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळीसाठी आजचा दिवस खास आहे. प्राजक्ता आज आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही तिने वाढदिवसाचा दिवस कुटुंबीयांसोबत साजरा केला. मात्र, यंदाच्या वाढदिवशी प्राजक्ताने स्वतःसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

2 / 5
प्राजक्ताने आपल्या वाढदिवसाची सुरुवात श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन केली. त्यानंतर तिने आई तळजाई मातेचेही आशीर्वाद घेतले. वाढदिवसानिमित्त काही फोटो शेअर करत तिने आपल्या आयुष्यात घेतलेल्या एका नव्या निर्णयाची माहिती चाहत्यांना दिली.

3 / 5
प्राजक्ता माळीने आता व्हेगन होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने यामागचे कारणही सांगितले. प्राजक्ताने सांगितले की, हा निर्णय तिने केवळ स्वतःच्या इच्छेने घेतलेला नसून तिच्या शरीराने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ स्वीकारणे बंद केले आहे. त्यामुळे तिला सतत खोकल्याचा त्रास होत असल्याचे तिने नमूद केले.

4 / 5
यापुढे आपण कॉफी आणि चहाही घेणार नाही, असे जाहीर केले तर चाहत्यांना आश्चर्य वाटू नये, असेही प्राजक्ताने म्हटले आहे. तिचे शरीर आता काही ‘तामसिक’ गोष्टी नाकारत असल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये सांगितले.

5 / 5
प्राजक्ताने आपल्या निर्णयाबद्दल बोलताना, ‘आता अधिकृतपणे मी क्रुएल्टी-फ्री झाले आहे’, असेही म्हटले आहे. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us