मुलांना जन्मालाच घालू नका..; थेट असं का म्हणाली अभिनेत्री?

एकल मातृत्वाबद्दल ही अभिनेत्री नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली. एकटीनेच मुलांचा सांभाळ करणं अत्यंत अवघड असल्याचं तिने म्हटलं आहे. ही अभिनेत्री लवकरच 'रामायणम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

| Updated on: Aug 07, 2025 | 10:55 AM
1 / 5
अभिनेत्री शीबा चड्ढा ही बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने पडद्यावर आई, बहीण आणि पत्नी अशा विविध भूमिका अत्यंत चोख साकारल्या आहेत. शीबा खऱ्या आयुष्यातसुद्धा एका मुलीची आई आहे. परंतु मुलीचं एकटीनेच पालनपोलष करणं खूप कठीण असल्याची भावना तिने व्यक्त केली.

2 / 5
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत शीबाने 'सिंगल मदर' (एकल मातृत्त्व) आणि त्यामुळे येणाऱ्या अडचणी यांविषयी सांगितलं.

3 / 5
शीबा म्हणाली, "सिंगल मदर होणं खूप कठीण आहे. प्रत्येक बाजूने हे खूप अवघड आहे. जरा काही झालं तरी तुम्हाला तुमच्या बाळासाठी उठून उभं राहावं लागतं. मी प्रत्येक सिंगल मदरच्या दु:खाला खूप चांगल्याप्रकारे समजते. आधी बाळाची देखभाल करण्यासाठी खूप लोकं असायची. परंतु आता कुटुंब खूप छोटी आहेत. त्यामुळे समस्या निर्माण होतात."

4 / 5
"मला असं वाटतं की आता मुलांना जन्मालाच घालू नये. मला अनेकदा माझ्या मुलीसाठी सेटवरून पळत घरी यावं लागलं. एकेकाळी मी बऱ्याच चांगल्या प्रोजेक्ट्सनाही नकार दिला. जेणेकरून मी माझी मुलगी नूरची देखभाल करू शकेन", असं ती पुढे म्हणाली.

5 / 5
शीबा लवकरच नितेश तिवारी यांच्या 'रामायणम्' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती मंथराची भूमिका साकारणार आहे.