
अभिनेत्री वर्षा उसगांवकर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून वर्षा उसगांवकर या त्यांच्या चित्रपटांपेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत.

वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. वर्षा उसगांवकर यांचे लग्न 2000 साली झाले.

मुळात म्हणजे वर्षा उसगांवकर यांना लवकर लग्न करायचे नव्हते. हेच नाही तर लग्न अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये रजिस्टर मॅरेज करायचे होते.

आपल्या लग्नाबद्दल काही दिवसांपूर्वीच खुलासा करताना वर्षा उसगांवकर या दिसल्या. लग्न रजिस्टर मॅरेज करण्याची इच्छा होती पण तसे होऊ शकले नाही.

माझ्या बहिणीच्या घरी नातेवाईकांच्या उपस्थितमध्ये माझे लग्न झाले. माझ्या बहिणीचे घर समुद्रकिनारी आणि खूप मोठे असल्याचेही वर्षा उसगांवकर यांनी म्हटले.