नागपूरच्या आदित्य मंगल याने अपंगत्वावर मात करीत बारावीत मिळवले ८४ टक्के गुण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या निकालात नागपूर येथील आदित्य मंगल या दृष्टी अधू असलेल्या मुलाने बारावीच्या परीक्षेत शारीरिक अपंगत्वावर मात करीत ८४ टक्के गुण मिळवले आहेत.

| Updated on: May 02, 2026 | 6:43 PM
1 / 5
नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील आदित्य मंगल या दृष्टी अधू असलेल्या विद्यार्थ्याने अपंगात्वावर मात करीत बारावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

2 / 5
आदित्य याचे आई-वडील शेतकरी असून ते नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील रहिवासी आहेत. आदित्य याला पुढे  एमपीएससी परीक्षेची तयारी करायची असल्याचे त्याने भावना व्यक्त करताना म्हटले आहे.

3 / 5
नागपूर येथील समाजकल्याण वसतीगृहातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयापर्यंत दररोज सिटी बसने प्रवास करीत आदित्य याने वर्षभर जिद्दीने अभ्यासाची तयारी केली.

4 / 5
प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि शारीरिक मर्यादा यांच्यावर मात करीत आदित्य याने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

5 / 5
 बारावीच्या परीक्षेत बुलढाणा जिल्ह्याने दमदार कामगिरी करीत अमरावती विभागात अव्वल क्रमांक पटकावला आहे.जिल्ह्याचा एकूण निकाल 95.22 टक्के लागला आहे. यंदा 34 हजार 208 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी  32 हजार 575 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.मुलांचा निकाल 94.32 टक्के, तर मुलींचा निकाल 96.29 टक्के लागला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us