
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील जेठालाल म्हणजे दिलीप जोशी लवकरच मालिकेचा निरोप घेणार अशी चर्चा रंगली होती. यावर आता जेठालाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत जेठालाल म्हणाले, 'मी मालिका सोडणार अशा अफवा कोण पसरवत आहे मला माहिती नाही. याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही.'

'अशी अफवा पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मी भारताबाहेर गेलो तेव्हा असंच म्हटलं गेलं होतं. जेव्हा जेव्हा मी एखाद्या भागात दिसत नाही तेव्हा अशी अफवा पसरत असते.'

'मला माहित नाही की हे सर्व करायला कोणाला आवडतं. पण जोपर्यंत तारक मेहता मालिका प्रसारित होत आहे तोपर्यंत मी मालिकेत काम करत राहीन.' असं देखील जेठालाल म्हणाले.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेल्या 17 वर्षांपासून मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.