Google Gemini : रेट्रो फोटोनंतर आता नव्या ट्रेंडची तुफान चर्चा, लहानपणाचं आगळंवेगळं रुप येणार समोर!!

गुगल जेमिनीवरील रेट्रो फोटो सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहेत. असे असतानाच आता गुगल जेमिनीवर एक नवा ट्रेंड आला आहे. या ट्रेंमध्ये सामील होण्यासाठी आता लोक नवे फोटो तयार करत आहेत.

| Updated on: Sep 15, 2025 | 4:31 PM
1 / 6
सध्या सोशल मीडियावर एआय टूलच्या माध्यमातून तयार केले जाणारे रेट्रो फोटो सगळीकडेच चर्चेचा विषय ठरले आहेत. प्रत्येकाच्या सोशल मीडिया खात्यावर हे फोटो दिसून येत आहेत. गुगल जेमिनीच्या नॅनॉ बनाना (Nano Banana) फिचरमुळे फोटोंच्या नव्या ट्रेंडला सुरुवात झाली आहे.

2 / 6
नॅनो बनाना हे फिचर जेमिनी अॅपमध्ये अपलब्ध आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला स्वत:चे थ्रिडी फोटो तयार करता येतात. त्यानंतर जेमिनीवर रेट्रो फोटोंचा ड्रेंड आला. यामध्ये महिला लाल, काळ्या, निळ्या रंगाच्या साड्यांमध्ये दिसत आहेत. महिलांच्या या एआय फोटोंनी तर सोशल मीडियावर धुमाकुळ खातला आहे.

3 / 6
दरम्यान आता याच गुगल जेमिनीवर हग माय यंगर सेल्फ (Hug my younger self) हा नवा ट्रेंड आला आहे. या नव्या ट्रेंडमध्ये एखाद्या व्यक्तीला स्वत:च्याच लहाणपणीच्या फोटोसोबत दाखवता येते. लहानपणाचा फोटो आणि स्वत:चा मोठे झाल्यानंतरचा फोटो एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळत असल्यामुळे हा नवा ट्रेंड आता चर्चेचा विषय ठरला आहे.

4 / 6
व्हायरल झालेल्या या ट्रेंडप्रमाणे फोटो कसे तयार करायचे, हे समजून घेऊ या. सर्वात अगोदर तुम्हाला गुगल जेमिनी अॅप डाऊनलोड करावे लागले. त्यानंतर तुमच्या जीमेल खात्याच्या मदतीने लॉगिन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला एकूण दोन इमेजेस निवडायच्या आहेत.

5 / 6
यातील एक इमेज ही तुमची चालू वयातील असेल तर दुसरी लहाणपणीची इमेज असली पाहिजे. त्यानंतर click a cute polaroid picture of my older self hugging my younger self. असा प्रॉम्ट द्यावा लागेल. त्यानंतर जेमिनीला इमेज तयार करण्याची कमांड द्यावी लागेल आणि काही सेकंद वाट पाहावी लागेल.

6 / 6
पुढच्याच काही सेकंदांत तुम्हाला तुमची hug my younger self या ट्रेंडमध्ये सामील होण्यासाठी इमेज मिळून जाईल. दरम्यान, रेट्रो फोडो, थ्रीडी मॉडेल फोटोंमुळे गुगल जेमिनी जगभरात लोकप्रिय झाले आहे. जेमिनीने चॅट जिपीटीलााही मागे टाकले असल्याचे बोलले जात आहे.