
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाल्यापासून त्याचे चाहते हैराण झाले आहेत. हेच नाही तर सतत त्याच्यासाठी प्रार्थना केली जातंय.

तारक मेहता मालिकेत सोढीच्या मुलाची भूमिका साकारणारा गोगी अर्थात समय शाह याने आता मोठे भाष्य केले. समय शाह म्हणाला की, अगोदर तर मी गुरुचरण सिंग हे बेपत्ता झाले, यावर विश्वासच ठेवला नाही.

मी लगेचच त्यांच्या दोन्ही फोनवर काॅल केला, परंतू संपर्क होऊ शकला नाही. ज्यावेळी पोलिसात तक्रार दाखल केली, त्यावेळी मला धक्काच बसला.

मुळात म्हणजे ते खूप जास्त हिंमतवाले आहेत. मला विश्वास आहे की, ते नक्कीच लवकर वापस येतील. समय शाह देखील तणावात दिसून आला.

फक्त समय शाह हाच नाही तर जवळपास सर्वच कलाकार गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यापासून टेन्शनमध्ये दिसत आहेत. या प्रकरणात पोलिस तपास करत आहेत.