
अभिनेत्री विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी 2017 मध्ये लग्न केलं. दोघांच्या वयातील अंतराची देखील चाहत्यांमध्ये चर्चा रंगलेली असते.

अनुष्का शर्मा हिचा आज वाढदिवस आहे. अभिनेत्री 36 वर्षांची आहे. अनुष्का, विराट याच्यापेक्षा 188 दिवस म्हणजे 6 महिने 4 दिवस मोठी आहे. 1 मे 1988 मध्ये अनुष्का शर्मा हिचा जन्म झाला.

विराट कोहली याचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 मध्ये दिल्ली याठिकाणी एका पंजाबी कुटुंबात झाला. विराट कोहली आता 35 वर्षांचा आहे. क्रिकेट विश्वात विराट कोहली अव्वल स्थानी आहे.

रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा आणि पती विराट कोहली यांची नेटवर्थ 1300 कोटी रुपये आहे. यामध्ये विराट कोहली याची नेटवर्थ 1050 आहे आणि अनुष्का हिची नेटवर्थ 255 कोटी आहे.

विराट आणि अनुष्का यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांच्या मुलीचं नाव वामिका, तर मुलाचं नाव अकाय असं आहे. 2024 मध्ये अभिनेत्रीने लंडन येथे अकाय याला जन्म दिला.