विचित्र मुखवटे, वेशभूषा अन्… गणेशोनिमित्त या मंडळाने साकारला भुतांचा थरारक देखावा

अहिल्यानगरच्या राहाता शहरात, महाराष्ट्र नवनिर्माण सेना गणेश मित्र मंडळाने "पुरानी हवेली" नावाचा एक भयानक, तरीही सामाजिक संदेश देणारा देखावा सादर केला आहे. बालकलाकारांच्या अभिनयाने आणि आवाज-प्रकाशयोजनाने हा देखावा अत्यंत जिवंत आहे.

| Updated on: Sep 06, 2025 | 8:30 AM
1 / 6
अहिल्यानगरमधील राहाता शहरात यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना गणेश मित्र मंडळाने पुरानी हवेली नावाचा एक अनोखा आणि थरारक जिवंत देखावा सादर केला आहे.

2 / 6
भुतांचे विश्व दाखवणाऱ्या या देखाव्याला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा देखावा केवळ मनोरंजनासाठी नसून, भूत-प्रेतांबाबतची समाजात असलेली अंधश्रद्धा दूर करणे हा त्यामागील मुख्य उद्देश असल्याचे मंडळाने सांगितले आहे

3 / 6
या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात बालकलाकार सहभागी झाले आहेत. हे कलाकार वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे घालून आणि विशेष वेशभूषा करून चित्रपटांमधील भुतांसारखे भासणारे थरारक अनुभव देतात.

4 / 6
आवाजाचे विशिष्ट तंत्रज्ञान, प्रभावी प्रकाशयोजना आणि कलाकारांच्या भयावह अभिनयामुळे हा देखावा अधिकच जिवंत वाटतो. त्यामुळे अनेक प्रेक्षकांचा थरकाप उडतो. हा देखावा दररोज रात्री 11 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

5 / 6
लहान मुले आणि महिलांसह अनेक नागरिक हा थरारक अनुभव घेण्यासाठी गर्दी करत आहेत. मंडळाचे अध्यक्ष विजय मोगले यांनी सांगितले की, जगात भूत अस्तित्वात नाही. हीच भीती घालवण्यासाठी हा देखावा साकरण्यात आला आहे.

6 / 6
तसेच भूत-प्रेतांबद्दलची अंधश्रद्धा नष्ट व्हावी या हेतूने आम्ही हा देखावा साकारला आहे. या वेगळ्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यामुळे केवळ मनोरंजनच नाही, तर एक महत्त्वाचा सामाजिक विषयही समाजासमोर मांडला गेला आहे.