
अहमदाबाद येथील विमान का कोसळले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. या क्षेत्रातील विमानाच्या अपघाताची वेगवेगळी कारणं सांगत आहेत. आता मात्र अमेरिकेतील प्रसिद्ध एव्हिएशसन एक्सर्प्ट जॉन एम. कॉक्स यांनी एअर इंडियाच्या एआय-171 या विमानाच्या अपघाताची संभाव्य कारणं सांगितली आहेत.

कॉक्स यांच्यानुसार अपघातग्रस्त विमानाचे सुटे भाग व्यवस्थितरीत्या लावण्यात आले नव्हते. आंतरराष्ट्रीय माध्यम असलेल्या असोशिएटेड प्रेसशी त्यांनी बातचित केली आहे. यावेळी त्यांनी या विमान अपघाताची काय कारणं असू शकतात हे सांगितलं आहे.

कॉक्स यांनी सांगितल्यानुसार विमान चांगल्या पद्धतीन टेकऑफ घेऊ शकले नाही. त्यामुळेच त्याचा अपघात झाला. कॉक्स हे वॉशिंग्टन डीसी येथील सेफ्टी ऑपरेटिंग सिस्टिमचे सीईओ आहेत.

विमान ज्या वेळी उड्डाण घेत होते, त्यावेळी त्याचे स्लॅट्स आणि फ्लॅप हे भाग योग्य स्थितीत नव्हते, असं कॉक्स यांनी सांगितलं.

तसेच ज्यावेळी विमान टेकऑफ घेत होतं. तेव्हा त्याचा पुढचा भाग वर होता. नंतर मात्र हे विमान खाली कोसळायला लागलं. म्हणजेच हे विमान टेकऑफच्या वेळी पुरेशा प्रमाणात वर जाऊ शकलं नाही, असंही कॉक्स यांनी सांगितलं. स्लॅट्स आणि फ्लॅप ज्या स्थितीत हवेत त्या स्थितीत नव्हते असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, या विमानाच्या अपघाताची वेगवेगळी कारणं सांगितली जात असली तरी या विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडल्यानंतर अपघाताचे नेमके कारण काय हे समजू शकणार आहे.