ऐश्वर्या राय की माधुरी दीक्षित, 24 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या Devdas साठी कोणाला जास्ट फी मिळालेली?

Aishwarya Madhuri Devdas Fees: 12 जुलै 2002 मध्ये प्रदर्शित झालेला 'देवदास' सिनेमा आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. सिनेमात तब्बल 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण असं असताना देखील सिनेमा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सिनेमात ऐश्वर्या राय की माधुरी दीक्षित यांनी महत्त्वाची भूमिका साकारलेली, आता त्यांच्या फीचा आकडा देखील समोर आला आहे.

| Updated on: Jul 13, 2026 | 4:08 PM
1 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात 'पारो'ची भूमिका साकारण्यासाठी ऐश्वर्या रायला सुमारे 1.5 कोटी रुपयांचं मानधन देण्यात आलं होतं. त्या काळात कोणत्याही अभिनेत्रीसाठी ही एक मोठी रक्कम मानली जात होती. सिनेमात तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसावं यासाठी कोलकाताहून सुमारे 600 साड्या मागवण्यात आल्या होत्या.

2 / 5
तर, 'चंद्रमुखी'च्या भूमिकेसाठी माधुरी दीक्षितला सुमारे 2.7 ते 3 कोटी रुपयांचं मानधन मिळालं. म्हणजेच, मानधनाच्या बाबतीत माधुरीने ऐश्वर्या रायला देखील मागं टाकलं. शिवाय, या सिनेमासाठी तिने अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेले वेशभूषा परिधान केली होती, ज्यांची किंमत सुमारे 15 लाख रुपये इतकी होती.

3 / 5
सिनेमात 'देवदास'ची भूमिका साकारणाऱ्या शाहरुख खानला सुमारे  3.5 कोटी रुपयांचे मानधन मिळालं, तर 'चुन्नीलाल'च्या भूमिकेसाठी जॅकी श्रॉफने साधारण १ कोटी रुपये घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, बजेटमुळे काही कलाकारांनी सिनेमा पूर्ण होऊ शकवा यासाठी काही सीन चित्रीकरणात कोणतंही मानधन न घेता सहकार्य केलं.

4 / 5
 सुमारे 50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'देवदास'ने भारतात सुमारे 41.67 कोटी रुपये आणि जगभरात सुमारे 90.63  कोटी रुपयांची कमाई केली. या सिनेमाच्या भव्य सेटनीही विशेष लक्ष वेधून घेतले.

5 / 5
सांगायचं झालं तर, एकट्या चंद्रमुखीच्या 'कोठ्या'चा सेट उभारण्यासाठीच सुमारे 12 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, ज्यामुळे हा त्या काळातील सर्वात महागड्या सिनेमांपैकी एक ठरला. सिनेमातील काही सीन आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Follow Us