AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज जीआर हाती नाही दिला तर… मांजरीत 600 आदिवासी विद्यार्थ्यांचा अल्टिमेटम, काय दिला इशारा?

Collective Hunger Strike: विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 16 दिवसांपासून त्यांचे पुण्यातील मांजरी येथे उपोषण सुरू आहे. आज या विद्यार्थ्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. काय आहे त्यांचा इशारा?

आज जीआर हाती नाही दिला तर... मांजरीत 600 आदिवासी विद्यार्थ्यांचा अल्टिमेटम, काय दिला इशारा?
आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 9:20 AM
Share

दिपक कापरे, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी:  पुण्याजवळील मांजरी स्टड फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या 16 दिवसांपासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती परवा खालवली होती. मंत्री नरहरी झिरवळ यांनी त्यांना खाऊन-पिऊन उपोषणाचा सल्ला दिल्याने विद्यार्थी नाराज झाले. त्यांच्या आंदोलनाला उलट धार चढली. आज विद्यार्थ्यांनी सरकारला मोठा अल्टिमेटम दिला आहे. आता सामूहिक उपोषणाचा विद्यार्थ्यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारपुढे पेच वाढणार आहे.

तोगडा निघणार कधी?

आता आंदोलन तिसऱ्या आठवड्यात पोहचले आहे. पण आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही मागण्यांबाबत तडजोड होताना दिसली. मंत्री नरहरी झिरवळ, मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांना सबुरीचा सल्ला दिला. पण सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नसल्याची ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. या आंदोलनाला नागपूरसह इतर शहरातूनही प्रतिसाद मिळत आहे. या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यात आला आहे. आंदोलनकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

600 विद्यार्थ्यांचे सामूहिक आमरण उपोषण

सरकार न्याय मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने आदिवासी विद्यार्थीही ईरेला पेटले आहेत. सरकारने लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात आणि तोडगा काढवा अशी विनंती त्यांनी केली आहे. आता आंदोलनाचा पुढचा टप्पा विद्यार्थ्यांनी आज जाहीर केला. त्यानुसार, मांजरी येथील 600 विद्यार्थी सामूहिक आमरण उपोषण करणार आहेत. त्यांच्या या पावित्र्यानंतर सरकारसमोर पेच वाढला आहे. आज संध्याकाळपर्यंत हे विद्यार्थी सरकारच्या प्रतिसादाची वाट पाहणार आहेत. त्यानंतर सर्वांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एका आंदोलकाने दिली.

आज सरकारने जीआर हाती दिला नाही तर 600 विध्यार्थी करणार सामूहिक उपोषण? विध्यार्थ्यांचा सरकारला इशारा दिला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सरकार कडून मागण्या मान्य झाल्याचे म्हटले जात आहे. मागण्यांचा जीआर हातात न मिळाल्याने सोळाव्या दिवशी देखील उपोषण सुरू आहे. सरकारला दिलेली दोन दिवसाची मुदत आज संपली.

काय आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या?

शहरांच्या मध्यवर्ती भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारावेत

आदिवासी वसतिगृहाबाबत यावर्षी घेतलेला निर्णय रद्द करावा

प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी

विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण योजनेतंर्गत मिळणाऱ्या रक्कमेत वाढ करावी

2011 मध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी

शिल्लक 12 हजार 500 पदांची भरती करावी

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदत द्यावी

Follow Us
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप