Aishwarya Rai: राणी मुखर्जीसह ‘या’ सेलिब्रिटींसोबत ऐश्वर्याचा 36 चा आकडा, शेवटच्या श्वासापर्यंत नाही पाहणार तोंड

Aishwarya Rai: आज अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा वाढदिवस आहे, याच कारणामुळे सर्वत्र ऐश्वर्या हिची चर्चा रंगली आहे. बॉलिवूडमध्ये काही असे सेलिब्रिटी आहेत, त्यांचा चेहरा ऐश्वर्या शेवटच्या श्वासापर्यंत पाहणार नाही. त्यामध्ये फंक्त ऐश्वर्याचा एक्स-बॉयफ्रेंड सलमान खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी नाही, तर अन्य लोकप्रिय सेलिब्रिटी देखील आहे. सलमान खान आणि ऐश्वर्या यांच्याबद्दल तर सर्वांना माहिती आहे.. इतर सेलिब्रिटींबद्दल घ्या जाणून...

| Updated on: Nov 01, 2026 | 3:24 PM
1 / 5
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांच्यात चांगले संबंध नाहीत. एका पुरस्कार सोहळ्यात करीनाने ऐश्वर्याच्या हातातून मायक्रोफोन हिसकावून घेतल्याचं देखील व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच त्यांच्यात सुरु असलेलं कोल्ड वॉर हे करीनानेच सुरु केलं होतं असंही म्हटलं जातं.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांच्यात चांगले संबंध नाहीत. एका पुरस्कार सोहळ्यात करीनाने ऐश्वर्याच्या हातातून मायक्रोफोन हिसकावून घेतल्याचं देखील व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच त्यांच्यात सुरु असलेलं कोल्ड वॉर हे करीनानेच सुरु केलं होतं असंही म्हटलं जातं.

2 / 5

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्यातील नाते एकेकाळी चर्चेत होते. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या विवेकला डेट करू लागली होती. तथापि, विवेक ओबेरॉयने सलमान खानबद्दल माध्यमांना दिलेल्या वादग्रस्त विधानांमुळे हे नाते संपुष्टात आले.

3 / 5

भिनेत्री राणी मुखर्जी आणि ऐश्वर्या राय बच्चन एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. अनेक कार्यक्रमात त्या एकत्रही दिसत असतं. पण सलमान आणि ऐश्वर्याच्या वादानंतर “चलते चलते” सिनेमात ऐश्वर्याला रिप्लेस करून राणीला घेण्यात आले होते. राणीने ही गोष्ट ऐश्वर्यापासून लपवून ठेवल्यामुळे ती दुखावली होती तेव्हापासून ऐश्वर्याने राणीशीही बोलणं बंद केलं आहे.

4 / 5

ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेन यांच्या ‘मिस इंडिया 1994′ पासूनच दुरावा आला. मिस इंडिया 1994’ सुष्मिता सेन जिंकली आणि ऐश्वर्याने तिच्यासोबत बोलायचं बंद केलं.

5 / 5

सोनम कपूर एकदा मीडियासमोर ऐश्वर्या रायला ‘आंटी’ म्हणाली होती. त्यामुळे ऐश्वर्या खूप नाराज झाली होती. त्यावेळी सोनम आणि ऐश्वर्या लॉरियल ब्रँडसाठी काम करत होत्या. पण या वक्तव्यामुळे सोनम आणि ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us