Aishwarya Rai: वयाच्या 52व्या वर्षी ऐश्वर्या रायचा मोठा निर्णय, सोशल मीडियावर होतेय चर्चा

Aishwarya Rai: यापूर्वी ‘लॉरिअल पॅरिस’ने ऐश्वर्य रायला हटवून अभिनेत्री आलिया भट्टला घेतले असल्याचे म्हटले जात होते. अनेक बॅनवर देखील आलियाचा फोटो होता. पण आता पुन्हा ऐश्वर्या दिसायला लागल्यामुळे चाहते आनंदी झाले आहेत.

| Updated on: Sep 29, 2026 | 8:29 AM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हे जगभरात चर्चेत असते. तिने वयाच्या 52व्या वर्षी मोठा निर्णय घेतला आहे. तिने पुन्हा एकदा रॅम्पवर आपला जलवा दाखवला आहे. तिने पुन्हा ‘लॉरिअल पॅरिस’सोबत काम करण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हे जगभरात चर्चेत असते. तिने वयाच्या 52व्या वर्षी मोठा निर्णय घेतला आहे. तिने पुन्हा एकदा रॅम्पवर आपला जलवा दाखवला आहे. तिने पुन्हा ‘लॉरिअल पॅरिस’सोबत काम करण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

2 / 5

ऐश्वर्या राय पुन्हा आपल्या शानदार अंदाजाने चर्चेत आली आहे. पॅरिसमध्ये आयोजित एका भव्य फॅशन इव्हेंटमध्ये अभिनेत्रीने आपल्या रॉयल लूक आणि शानदार रॅम्प वॉकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आयफिल टॉवरसमोर ५२ वर्षांच्या ऐश्वर्याने आपल्या शानदार अंदाजात दिसली.

3 / 5

या इव्हेंटमध्ये ऐश्वर्यासोबत हॉलिवूड मॉडेल केंडल जेनर आणि अभिनेत्री सिमोन एश्लीसह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीही उपस्थित होत्या. ऐश्वर्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या पुन्हा रॅम्पवर येण्याच्या निर्णयाचे कौतुक सुरू आहे.

4 / 5

खरं तर, पॅरिस फॅशन वीकदरम्यान आयोजित ‘लॉरिअल पॅरिस’च्या इव्हेंटमध्ये ऐश्वर्याने आयफिल टॉवरसमोर रॅम्प वॉक केला. भारतीय सौंदर्य पाहून तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. आपल्या शाही अंदाजाने आणि जबरदस्त आत्मविश्वासाने तिने संपूर्ण शो जिंकली.

5 / 5

इव्हेंटसाठी ऐश्वर्याने यारा शोमेकरने डिझाइन केलेला वेल्व्हेट आउटफिट परिधान केला होता. तिच्या ड्रॅमॅटिक लूकमध्ये रॉयल अंदाज आणि ग्लॅमरचे सुंदर मिश्रण दिसले. रॅम्पवरील तिचा आत्मविश्वास आणि अंदाज लोकांना खूप आवडला. सोशल मीडियावर फॅन्स तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सौंदर्याची आणि ग्रेसची प्रशंसा करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us