
'हम दिल दे चुके सनम' चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय आणि सलमान खानची जोडी हिट ठरली. हा चित्रपट 1999 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटात सलमान खान, ऐश्वर्या राय यांच्यासह अजय देवगणही महत्वाच्या भूमिकेत होता.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका केला. मात्र, तुम्ही हे जाणून हैराण व्हायल की, निर्मात्यांची पहिली पसंत कधीच ऐश्वर्या नव्हती. करीना कपूर खान ही निर्मात्यांची पहिली पसंत होती.

करीना कपूर हिने हम दिल दे चुके सनम चित्रपटाला नकार दिला. त्यानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाची ऑफर ऐश्वर्या रायला दिली आणि तिने लगेचच चित्रपटासाठी होकार दिला.

जर करीना कपूर खान हिने या चित्रपटाला फक्त एक होकार दिला असता तर कधीच ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांची जोडी इतकी जास्त चर्चेत आली नसती.

हम दिल दे चुके सनम चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठे प्रेम दिले. जबरदस्त कामगिरी चित्रपटाने केली. आजही या चित्रपटातील गाणी फेमस आहेत.