अक्किनेनी कुटुंबातील तो ‘अभिनेता’, 50 व्या वर्षी करणार दुसरं लग्न, 46 व्या वर्षी बहीण आहे अविवाहित!

साऊथ इंडस्ट्रीमध्ये अक्किनेनी कुटुंब हे प्रसिद्ध आहे. या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची चर्चा सुरु असते. वयाच्या ५०व्या वर्षी तो लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

| Updated on: May 04, 2025 | 5:08 PM
1 / 7
अक्किनेनी कुटुंबात काही दिवसांपूर्वीच नव्या नवरीची एन्ट्री झाली आहे. साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य याने सामंथापासून घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न केलं आहे. तर नागार्जुन यांचा दुसरा मुलगा निखिल देखील लग्न करणार आहे. याच दरम्यान, अक्किनेनी कुटुंबातून आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

अक्किनेनी कुटुंबात काही दिवसांपूर्वीच नव्या नवरीची एन्ट्री झाली आहे. साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य याने सामंथापासून घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न केलं आहे. तर नागार्जुन यांचा दुसरा मुलगा निखिल देखील लग्न करणार आहे. याच दरम्यान, अक्किनेनी कुटुंबातून आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

2 / 7

ही आनंदाची बातमी साऊथ अभिनेता सुमंत कुमारशी संबंधित आहे. नागार्जुन यांचा भाचा सुमंतविषयी चर्चा आहे की तो दुसऱ्यांदा लग्नाच्या बंधनात अडकू शकतो. सुमंत हा अक्किनेनी नागेश्वर राव यांच्या मुलीचा मुलगा आहे.

3 / 7

मीडिया अहवालानुसार, सुमंत एका अभिनेत्रीला डेट करत आहे. असा दावा केला जात आहे की, दोघे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकू शकतात. विशेष म्हणजे, सुमंत याची धाकटी बहीण सुप्रिया यार्लागड्डा हिचं वय 46 वर्षे आहे, पण तिचं अद्याप लग्न झालेलं नाही.

4 / 7

सुमंतबाबत असं म्हटलं जात आहे की, तो 50 व्या वर्षी दुसरं लग्न करू शकतो. मीडियामध्ये अशीही बातमी आहे की, दोन्ही कुटुंबांनी या नात्याला मान्यता दिली आहे. मात्र, या विषयी अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

5 / 7

नागा चैतन्य यांचा चुलत भाऊ सुमंत याचं पहिलं लग्न 2004 मध्ये झालं होतं. त्याने कीर्ति रेड्डीशी लग्न केलं होतं. कीर्ति ही देखील एक अभिनेत्री आहे, जिने अनेक सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे. मग तो महेश बाबूसोबतचा 'अर्जुन' असो वा पवन कल्याणचा 'थोली प्रेमा'. ती तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री राहिली आहे.

6 / 7

पण कीर्ति रेड्डी आणि सुमंत यांचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि दोघांनी 2006 मध्ये घटस्फोट घेतला. तर घटस्फोटानंतर 2014 मध्ये कीर्तिने कार्तिक एन याच्याशी लग्न केलं.

7 / 7

सुमंत याच्या करिअरबद्दल बोलायचं तर, त्याने राम गोपाल वर्मा यांच्या 'प्रेम कथा' चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो 'जवानी' आणि 'विवाह' सारख्या चित्रपटांमध्ये दिसला. मात्र, सुमंत याला नागार्जुन व इतर मोठ्या कलाकारांप्रमाणे करिअरमध्ये यशस्वी ठरता आलं नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us