हा अभिनेता स्वत:च्या लग्नात मेकअप आर्टिस्टची बाईक घेऊन पोहोचलेला, पत्नीने ठेवलेली खास अट

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारसोबत लग्न करण्यासाठी ठेवलेली मोठी अट. ही अट जिंकताच अक्षय मेकअप आर्टिस्टची बाईक घेऊन पोहोचलेला घरी. कोणती होती ती अट?

| Updated on: Aug 25, 2026 | 2:30 PM
1 / 5
बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. दोघेही अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील किस्से चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. मात्र, त्यांच्या लग्नाची सुरुवात एका मजेशीर कराराने झाली होती, हे फार कमी जणांना माहीत असेल.

2 / 5
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या रिलेशनशिपच्या काळात ट्विंकलने एक अट ठेवली होती. आमिर खानचा ‘मेला’ चित्रपट फ्लॉप झाला तरच ती अक्षयशी लग्न करेल असं ट्विंकलने म्हटलं होतं. त्यावेळी सर्वांनाच ‘मेला’कडून मोठ्या अपेक्षा होत्या.

3 / 5
मात्र, चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही आणि त्यानंतर अक्षय-ट्विंकल यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अक्षय कुमारने स्वतः ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात या किस्स्याचा खुलासा केला होता.

4 / 5
अक्षय आणि ट्विंकल यांच्या लग्नाची आणखी एक गंमतीदार आठवण दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी सांगितली आहे. ते म्हणाले की, अक्षयच्या लग्नाच्या दिवशीसुद्धा तो शूटिंग करत होता. त्या दिवशी अमिताभ बच्चन आणि राखी यांच्यासोबत ‘एक रिश्ता’ चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. शूटिंग संध्याकाळी साडेसातच्या सुमारास संपल्यानंतर अक्षयला थेट लग्नासाठी निघायचं होतं.

5 / 5
सुनील दर्शन यांच्या माहितीनुसार, शूटिंग संपताच अक्षयने वेळ वाचवण्यासाठी त्याच्या मेकअप आर्टिस्टची दुचाकी घेतली आणि हेल्मेट घालून थेट घरी रवाना झाला. हेल्मेटमुळे रस्त्यात त्याला कोणी ओळखू शकले नाही. घरी पोहोचल्यानंतर त्याने लग्नासाठी तयारी केली.

Follow Us