
मुस्लिम समुदायात निरोप घेताना अनेकदा अल्लाह हाफिज किंवा खुदा हाफिज हे शब्द वापरले जातात.

या दोन्ही शब्दांचा अर्थ 'अल्लाह (ईश्वर) तुमचे रक्षण करो' असाच होतो. मात्र, या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे, याबद्दल आपण जाणून घेऊया.

'अल्लाह हाफिज' आणि 'खुदा हाफिज' या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच असला तरी, त्यांचे मूळ वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे.

'खुदा' हा पर्शियन भाषेतील शब्द आहे, ज्याचा अर्थ 'ईश्वर' किंवा 'देव' असा होतो.

तर 'अल्लाह' हा अरबी भाषेतील शब्द असून, याचा अर्थही 'ईश्वर' किंवा 'देव' असाच होतो. इस्लाम धर्मात 'अल्लाह' हेच परमेश्वराचे नाव आहे.

या दोन्ही शब्दांमधील मुख्य फरक हा केवळ त्यांच्या भाषिक उत्पत्तीचा असून 'खुदा हाफिज' हा पर्शियन भाषेतून आलेला शब्द आहे. तर 'अल्लाह हाफिज' हा अरबी भाषेतून आलेला शब्द आहे.

पाकिस्तान, भारत आणि बांग्लादेशात 'खुदा हाफिज' हा शब्द अधिक प्रचलित होता. मात्र, अलिकडच्या काळात 'अल्लाह हाफिज' हा शब्द अधिक प्रमाणात वापरला जाऊ लागला.

ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत या फरकाबाबत सांगितले होते की, हा फरक शिया आणि सुन्नी पंथांमधील फरकाशी संबंधित आहे.

'अल्लाह हाफिज' आणि 'खुदा हाफिज' या दोन्ही शब्दांचा वापर हा त्या-त्या प्रदेशातील सांस्कृतिक आणि भाषिक प्रभावावर अवलंबून असतो. या दोन्ही शब्दांचा हेतू निरोप देताना ईश्वर तुमचे रक्षण करो, हाच असतो.