
जास्मिन भसीन ही नेहमीच चर्चेत असणारी टीव्ही अभिनेत्री आहे. गेल्या काही दिवसांपासून जास्मिन भसीन ही अली गोनी याला डेट करत आहे. अनेकदा हे एकसोबत स्पाॅट देखील होतात.

जास्मिन भसीन आणि अली गोनी हे त्यांच्या आगामी गाण्याचे शूटिंग करताना दिसत आहेत. मात्र, यावेळी सेटवर असे काही घडले की, जास्मिन भसीन हिच्या चेहऱ्यांचा रंगच उतरला.

गाण्याचे शूटिंग सुरू असतानाच अली गोनी याच्या डोळ्याला मोठी इजा झाली. अली गोनी याला त्रास होताना दिसले. यानंतर सेटवरील सर्वजण त्याची मदत करताना दिसत आहेत.

अली गोनी याला होणारा त्रास पाहून जास्मिन भसीन ही देखील टेन्शनमध्ये आल्याचे बघायला मिळाले. आता याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

जास्मिन भसीन आणि अली गोनी हे बिग बाॅसमध्ये सहभागी झाले होते. जास्मिन भसीन हिला सपोर्ट करण्यासाठी अली गोनी हा बिग बाॅसच्या घरात गेला होता.