ऐन दुष्काळात पाच एकर ऊस जळून खाक, विद्युत तारांनी घात केला, शेतकरीही जखमी

बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. केज तालुक्यातील सातेफळ येथील एका शेतकऱ्याचा पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे.

| Updated on: Nov 22, 2026 | 6:49 PM
1 / 5
बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.केज तालुक्यातील सातेफळ येथील एका शेतकऱ्याचा पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे.

बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.केज तालुक्यातील सातेफळ येथील एका शेतकऱ्याचा पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे.

2 / 5

शेतात असलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडल्या आणि यामुळे उसाला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती, की या आगीत संपूर्ण पाच एकर उसाचा जळून कोळसा झाला आहे.

3 / 5

दरम्यान आपल्या डोळ्यादेखत उसाला आग लागल्याचे पाहून शेतकऱ्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत संबंधित शेतकरी देखील जखमी झाला आहे.

4 / 5

दरम्यान आगीची माहिती मिळताच केज नगरपंचायतीचे अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. मात्र तोपर्यंत संपूर्ण उस आगीच्या विळख्यात सापडल्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं नाही.

5 / 5

या घटनेमुळे ऐन दुष्काळात शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us